पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना

पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात रोहन कांबळे नावाच्या युवकाचा मारेकऱ्यांनी खून केला. कंट्री वाईन शॉपच्या जवळील दुकाना समोर ही हत्या झालेली आहे. वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना
कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या

पिंपरी चिंचवड : हत्येच्या घटनांनी पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर आज पुन्हा एकदा हादरलं आहे. कंट्री वाईन शॉपजवळील दुकाना समोर तरुणाची हत्या करण्यात आली. गेल्या आठ दिवसात शहरातील ही खुनाची सातवी घटना आहे.

युवकाची हत्या

पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात रोहन कांबळे नावाच्या युवकाचा मारेकऱ्यांनी खून केला. कंट्री वाईन शॉपच्या जवळील दुकाना समोर ही हत्या झालेली आहे. वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आठवड्याभरात सात हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठ दिवसातील ही सातवी खुनाची घटना आहे. त्यामुळे एकूणच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दारुच्या नशेतील तरुणाचा गळा चिरला

दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच पिंपरी चिंचवड शहरातील नेवाळे वस्ती भागात घडली होती. मात्र त्याची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वीरेंद्र वसंत उमरगी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वीरेंद्र उमरगी यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते.

नेमकं काय घडलं?

वीरेंद्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिणारे मित्र त्यांच्याकडे ये-जा करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या एका मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून आरोपी फरार झाले आहेत.

पुण्यात दीराकडून वहिनीची हत्या

दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.

काय आहे प्रकरण?

महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा चुलत दीर तुकाराम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मित्राच्या मदतीने आधी अत्याचार करुन मग वहिनीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी चुलत दीर तुकाराम याने वहिनीला देहू रोड जवळील घोरवडेश्वर येथील मंदिर पाहण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले. तुकारामने मित्र अक्षयला ‘आपण मज्जा करु’ असे सांगून बोलवून घेतले. त्यानंतर दीर तुकाराम आणि त्याचा मित्र अक्षय या दोघांनी घोरवडेश्वर येथील डोंगरावर घेऊन जाऊन वहिनीवर बलात्कार केला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून, चेहऱ्यावर दगड टाकून तिची हत्या केली.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती.

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.

संबंधित बातम्या :

डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

पिंपरीत मद्यपी तरुणाची गळा चिरुन हत्या, राहत्या घरी मृतदेह आढळला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI