AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षाचालकाने घरात घुसून महिलेला पेटवलं, वाचवताना बहीणही भाजली, नाशकातील घटनेने खळबळ

रिक्षाचालक कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचित आहे. त्याने भारती गौड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. काही कळण्याच्या आतच त्याने बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले

रिक्षाचालकाने घरात घुसून महिलेला पेटवलं, वाचवताना बहीणही भाजली, नाशकातील घटनेने खळबळ
कार जाळली
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 9:14 AM
Share

नाशिक : पाहुण्या म्हणून आलेल्या महिलेला घरात घुसून मारहाण करत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या बहिणीला वाचवताना दुसरी महिलाही गंभीर जखमी झाली. आरोपी रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेत भाजलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकमध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

नाशिकच्या मखमलाबाद रोड भागात ही घटना घडली. या घटनेत सख्ख्या बहिणी जखमी झाल्या असून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

नेमकं काय घडलं?

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती गौड (55) आणि सुशिला गौड (65) अशी भाजलेल्या महिलांची नावे आहेत. प्रदीप ओमप्रकाश गौड हे शिंदे नगर भागातील भाविक बिलाजियो या इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी (10 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास गौड यांच्या मावशी भारती या त्यांच्या घरी आल्या. दोघी बहिणी आपले वयोवृद्ध वडील जानकीदास गौड यांच्याशी गप्पा मारत होत्या.
रिक्षाचालकाकडून घरी घुसून मारहाण
त्याचवेळी दुपारी बारा वाजताच्या सुमारास रिक्षाचालक सुखदेव कुमावत तेथे अचानकपणे आला. कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचित आहे. त्याने मावशी भारती गौड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. यावेळी संतप्त झालेल्या कुमावत याने काही कळण्याच्या आत बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले. तसेच, त्यांना पेटवून देत पोबारा केला.
वाचवायला गेल्याने बहीण भाजली
या घटनेत सुशिला गौड याही आपल्या बहिणीस वाचवण्याच्या प्रयत्नात भाजल्या आहेत. वयोवृद्ध वडील जानकीदास गौड, पार्थ गौड (15) आणि चिराग गौड (3) ही बालके बालंबाल बचावली आहेत. चिमुकल्या पार्थ गौड याने वेळीच बेडरूममध्ये धाव घेत आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधल्याने ही घटना समोर आली आहे.
या घटनेत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला आहे. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.