
नवरा-बायकोच नातं हे पवित्र मानलं जातं. पत्नी तिच्या आई-वडिलांच घर सोडून मोठ्या विश्वासाने नवऱ्याच्या घरी येते. पत्नीचा आदर, सन्मान ही नवऱ्याची जबाबदारी असते. पण काही अपवाद सुद्धा असतात. पत्नीचा मान-सन्मान सोडा, उलट ते आपली विकृत वासना क्षमवण्यासाठी टोक गाठतात. असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉमिनिक पेलिको नावाच्या व्यक्तीला जवळपास 10 वर्ष पत्नीच मास रेप घडवून आणल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार डॉमिनिक पत्नीला नशेच औषध देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर अनोळखी माणसांना घरी बोलवून त्यांना पत्नीवर बलात्कार करायला लावायचा. या प्रकरणात न्यायालयाने डॉमिनिकसह 50 जणांना रेप, अटेम्प्ट टू रेप आणि लैंगिक हल्ला प्रकरणात दोषी ठरवलं आहे. फ्रान्सच्या एका न्यायालयाने हा निर्णय दिलाय. पीड़िता जीजेल पेलिको या डॉमिनिकला होणारी शिक्षा ऐकण्यासाठी खच्चून भरलेल्या कोर्ट रुममध्ये हजर होत्या. त्या म्हणाल्या की, “मी असं मानायची की, मी परफेक्ट मॅरेज...