AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडचा संघ सुपर 8 फेरीत, इटलीची झुंज अपयशी; स्कॉटलंडच्या आशा संपुष्टात

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 29व्या सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि सुपर 8 फेरीतील स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे क गटातील चित्र स्पष्ट झालं आहे.

T20 WC 2026 : वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडचा संघ सुपर 8 फेरीत, इटलीची झुंज अपयशी; स्कॉटलंडच्या आशा संपुष्टात
T20 WC 2026 : वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडचा संघ सुपर 8 फेरीत, इटलीची झुंज अपयशी; स्कॉटलंडचं आशा संपुष्टातImage Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Feb 16, 2026 | 6:27 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंडने इटलीचा धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 202 धावा केल्या. तसेच इटलीसमोर विजयासाठी 203 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे आव्हान काही इटलीला गाठता आलं नाही. इटलीचा संघ 178 धावांवर मजल मारू शकला. हा सामना इंग्लंडने 24 धावांनी जिंकला. इटलीचा संघ पराभूत झाला पण इंग्लंडचा चांगलाच घाम काढला. शेवटच्या षटकात 6 चेंडूत 25 धावा अशी स्थिती आणली होती. 24 चेंडूत 64 धावांवरून ही स्थिती येथपर्यंत आणली होती. यावरून हा सामना काही इटलीने सहज दिला नाही. या विजयासह इंग्लंडने सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इटली विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नव्हती. सुरूवातील झटपट विकेट पडल्याने दडपण वाढलं होतं. अवघ्या 105 धावांवर निम्मा संघ तंबूत होता. त्यामुळे 150 ते 160 धावा करेल असं वाटलं होतं. पण मधल्या फळीत आलेल्या विल जॅक्सने सामन्याचं चित्र बदललं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडला 202 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकार मारत नाबाद 53 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडला हा विजय सोपा झाला. नाही तर इटलीनेही दम काढला असता. इटलीकडून बेन मॅनेंटी याने 25 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याचा आक्रमक बाणा पाहून इंग्लंडला घाम फुटला होता. त्याने 6 षटकार आणि 4 चौकार मारले होते. त्याची विकेट पडली आणि सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकला.

इंग्लंडने वेस्ट इंडिजनंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे क गटाचं समीकरण संपलं आहे. या गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, स्कॉटलँड, इटली आणि नेपाळ हे संघ होते. या गटातून वेस्ट इंडिजने सुरुवातीचे तीन सामने जिंकून सुपर 8 फेरी गाठली होती. तर नेपाळचा संघ सलग पराभवानंतर स्पर्धेतून आऊट झाला होता. आता इंग्लंड इटली सामन्यानंतर या गटातून स्कॉटलँड आणि इटली हे संघ आऊट झाले आहेत. इटलीने हा सामना जिंकला असता तर स्कॉटलँड आणि इटलीच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. पण या सामन्यातील निकालाने या गटाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. आता टॉपला कोण राहील याची उत्सुकता आहे. इंग्लंड की वेस्ट इंडिज यांच्यात चुरस असेल.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...