AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद रफींचा कोळीगीत गाण्याचा हट्ट अन् जन्मास आलं सुपरहिट गाणं; राज ठाकरेंच्या वडिलांची होती महत्त्वाची भूमिका!

Mohammed Rafi Marathi Koli Geet: मोहम्मद रफी यांनी मराठीत कोळीगीत गाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यातून एका लोकप्रिय गाण्याचा जन्म झाला. कोणतं होतं हे गाणं आणि त्यासाठी श्रीकांत ठाकरे यांनी कोणती तयारी केली होती?

मोहम्मद रफींचा कोळीगीत गाण्याचा हट्ट अन् जन्मास आलं सुपरहिट गाणं; राज ठाकरेंच्या वडिलांची होती महत्त्वाची भूमिका!
Mohammed Rafi First Koli Geet Shrikant ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 3:33 PM
Share

भारतीय संगीतसृष्टीवर आपल्या अष्टपैलू आवाजाने अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी हिंदीसोबतच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आपले स्वरसाज उधळले. त्यांच्या आवाजातील रोमँटिक गाणी असोत वा भक्तिगीते, प्रत्येक गीताला त्यांनी न्याय दिला. मात्र, रफीसाहेबांच्या कारकिर्दीत एक असा रंजक किस्सा घडलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःहून एका मराठी कोळीगीताची मागणी केली होती. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याशी असलेल्या घट्ट मैत्रीमुळे तयार झालेले हे गाणं आजही कोळीगीत चाहत्यांच्या ओठांवर आहे.

रफीसाहेबांचाच होता कोळीगीत गाण्याचा आग्रह

संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मोहम्मद रफी यांनी काही मराठी गाणी आधीच गायली होती. एकदा एका नवीन गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान रफीसाहेबांना ते गाणं तसे गाताना काहीसं कठीण वाटायला लागलेलं. त्यावेळी त्यांनी श्रीकांत ठाकरेंना एक भन्नाट सूचना केली. “दादा, छोड दीजिए इसको, एक कोली गीत बनाइये” असे म्हणत त्यांनी अस्सल कोळीगीत गाण्याची आपली तीव्र इच्छा बोलून दाखवली. विशेष म्हणजे, हे गाणं महिला गायिकेसोबत ड्युएट गाण्यासही आपली तयारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

वंदना विटणकरांचे शब्द आणि पुष्पा पागधरे यांचा स्वर

रफीसाहेबांची ही इच्छा समजताच श्रीकांत ठाकरेंनी प्रसिद्ध गीतकार वंदना विटणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या गाण्यासाठी कोळी संस्कृतीची समज असलेल्या आणि दर्जेदार गायिका पुष्पा पागधरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर या गाण्याच्या जोरदार तालमी सुरू झाल्या. पुष्पा पागधरे यांच्यासोबत मोहम्मद रफी यांनीही अतिशय मन लावून सराव केला आणि अखेर रेकॉर्डिंग पूर्ण होऊन एक अफाट सुंदर कोळीगीत रसिकांच्या भेटीला आले.

‘अग पोरी, सांभाळ दर्याला तुफान आयलंय भारी’

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या भारदस्त अन् गोड आवाजात रेकॉर्ड झालेल्या या गाण्याचे बोल ‘अग पोरी, सांभाळ दर्याला तुफान आयलंय भारी’ असे होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरेंचे ठेका धरणारे संगीत आणि दोन्ही गायकांची सुरेल जुगलबंदी यामुळे हे गाणं तुफान गाजलं. बाजारात या गाण्याच्या रेकॉर्डचीही विक्रमी विक्री झाली होती. कोळी गीताचा उच्चार करताना सुरुवातीला थोडी अडचण येऊनही, रफीसाहेबांनी आपल्या मेहनतीने आणि आवाजाच्या जादूने या कोळीगीताला अजरामर करून टाकले.

Follow Us
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'