AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lara Dutta : इतिहासाने जिला चुकीचं समजलं अशी महिला…कैकयीला लारा दत्ताने दिला नवीन दृष्टीकोन, भावुक पोस्ट करत म्हणाली…

Lara Dutta : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कैकयीचं कौतुक केलं आहे.

Lara Dutta : इतिहासाने जिला चुकीचं समजलं अशी महिला...कैकयीला लारा दत्ताने दिला नवीन दृष्टीकोन, भावुक पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Nov 05, 2026 | 3:10 PM
Share

नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’ ५ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूरनं प्रभू राम, साई पल्लवीने सीता आणि यशनं रावणाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री लारा दत्ता देखील या भव्य पौराणिक गाथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिनं राजा दशरथाची पत्नी आणि प्रभू रामाची सावत्र आई कैकेयीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त, लारानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून अभिनेत्रीनं आपल्या भूमिकेबद्दल सांगितलं.

लारा दत्तानं सोशल मीडियावर कैकेयीच्या विविध अवतारांमधील स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक, राजेशाही लूक दिसत आहे. पोस्टसोबत अभिनेत्रीनं लिहिलं आहे की, अनेक वर्षांपूर्वी, तिला स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीचा भाग होण्याची इच्छा होती. तिला अशा कथेचा भाग व्हायचं होतं, जी काळ आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहील. आज तिला वाटतं की रामायणासारख्या अमर कथेच्या माध्यमातून तिची इच्छा पूर्ण झाली आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना, लारानं कैकेयीचं वर्णन इतिहासातील सर्वात गैरसमज झालेल्या स्त्रियांपैकी एक म्हणून केलं. अभिनेत्रीनं लिहिलं की, शतकानुशतकं एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेल्या आईची भूमिका साकारणं हे तिच्यासाठी एक मोठं सौभाग्य होतं. कैकेयीची माणुसकी पडद्यावर जिवंत करण्याची जबाबदारी तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, असं अभिनेत्री म्हणाली.

‘इतिहासाचा प्रवाह बदलणारी एक स्त्री’

लारानं तिच्या पोस्टमध्ये कैकेयीच्या निर्णयाच्या महत्त्वाविषयीही सांगितलं. पौराणिक कथेनुसार, कैकेयीनं राजा दशरथाकडे दोन वर मागितले होते, प्रभू रामासाठी १४ वर्षांचा वनवास आणि भरतासाठी सिंहासन. तिच्या या निर्णयानं रामायणाच्या कथेत एक निर्णायक वळण घेतलं. सर्वसाधारणपणे कैकेयीला रामाच्या वनवासासाठी जबाबदार मानलं जातं, परंतु लारानं तिच्या पोस्टमध्ये तिच्या व्यक्तिरेखेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेत्रीने लिहिलं की, कैकेयी एक अशी स्त्री होती जिनं इतिहासाची दिशा बदलली. तिचा निर्णय कथेच्या प्रवासाचा एक भाग मानला जाऊ शकतो. ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल लारानं कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या मते, कैकेयीला केवळ तिच्या एका निर्णयासाठीच नव्हे, तर तिच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत. लारा दत्तानं प्रेक्षकांना आवाहन केलं की, शतकानुशतके तयार झालेल्या रूढीवादी कल्पनांच्या पलीकडे जाऊन कैकेयीचे योगदान समजून घ्यावं.

दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत बनवण्यात आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासोबत रवी दुबे, सनी देओल, अरुण गोविल आणि लारा दत्ता यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!