AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आणखी एका बड्या बँकेत सर्वात मोठा घोटाळा, ग्राहकांचे पैसे परस्पर गायब, तुमचंही खातं आहे का? अकाउंट लगेच चेक करा

गेल्या काही वर्षांपासून बँका, पतसंस्थामधील घोटाळ्याचं प्रमाण वाढलं आहे. यातील अनेक बँकांवर आरबीआयकडून कडक कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर आता आणखी एका बँकेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.

मोठी बातमी! आणखी एका बड्या बँकेत सर्वात मोठा घोटाळा, ग्राहकांचे पैसे परस्पर गायब, तुमचंही खातं आहे का? अकाउंट लगेच चेक करा
bankImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 3:11 PM
Share

अलीकडच्या काळात बँक घोटाळ्याचं प्रमाण वाढताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बँक आणि पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्या बँकांमध्ये किंवा पतसंस्थांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेक बँकांवर आरबीआयकडून कडक कारवाई देखील करण्यात आली आहे. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढणे, नियमाबाह्य पद्धतीने कर्जाचं वाटप, या शिवाय इतर पद्धतीने बँकेत भ्रष्टाचार करणं असं या घोटाळ्यांचं स्वरुप आहे. दरम्यान अशीच एक मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे पीएनबी पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आहे, त्यामुळे ठेविदारांची चिंता वाढली आहे.

ग्रेटर नोएडामध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत तब्बल 10.24 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात मंगळवारी सीबीआयने बँकेतील एका महिला कर्मचाऱ्यासह अन्य एकाला अटक केली आहे. ग्राहकांची परवानगी नसताना परस्पर त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती या प्रकरणात सीबीआयच्या वतीने देण्यात आली आहे.

या प्रकरणात सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार दीपांशी नावाच्या एका महिला बँक कर्मचाऱ्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही महिला कर्मचारी ग्रेटर नोएडाच्या सेक्टर एकमध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ऑफिस असिस्टंट पदावर कार्यरत होती. तर याच प्रकरणात अन्य एका आरोपीला अटक करण्यात आलं असून ज्याचं नाव आशुतोष पाठक असं आहे. आशुतोष पाठक याला पुण्यामधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात 29 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. दीपांशी आणि आशुतोष पाठक यांनी काही अज्ञान आरोपींसोबत मिळून या बँकेत असलेल्या ग्राहकांचे पैसे त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर काढण्याचा आरोप आहे. जवळपास 10.24 कोटी रुपये याच पद्धतीने काढण्यात आले आहेत. एका महिलेनं या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!