AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्शुरन्स अधिकाऱ्यांना खोटी माहिती देत दिशाभूल केली, मग विमा कंपनीची ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

विमा मिळवण्यासाठी कंपनीकडे खोटे कागदपत्र सादर करत विमा अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तब्बल 19 जणांनी विमा कंपनीला चुना लावून लाखो रुपये मंजूर करुन घेतले.

इन्शुरन्स अधिकाऱ्यांना खोटी माहिती देत दिशाभूल केली, मग विमा कंपनीची 'इतक्या' लाखांची फसवणूक
घरांचा ताबा देण्यास नकार देणाऱ्या बिल्डरविरोधात तक्रारImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 18, 2023 | 8:16 PM
Share

कल्याण / सुनील जाधव : कल्याणमधील न्यू इंडिया एन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करुन विमा कंपनीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल 19 जणांनी विमा कंपनीची 14 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महात्मा फुले पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. कल्याण-मुरबाड रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची फसवणूक

सन 2018 ते 2019 या कालावधीत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुरबाड रस्त्यावरील गुरुगोविंद निवास संकुलातील कार्यालयात हा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीचे व्यवस्थापक सतिश संभाजी भगत यांनी 19 फसवणूकदारांविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

अधिकाऱ्यांची दिशाभूल करत विमा मंजूर करुन घेतले

या 19 जणांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विमा दाव्यासंदर्भात खोटी माहिती दिली. अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन 14 लाख 69 हजार 719 रुपयांचे विमा दावे मंजूर करुन घेतले. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, एपीआय दीपक सरोदे यांची टीम अधिक तपास करत आहेत.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित