Pune crime : दारू पिण्यासाठी खुर्च्या दिल्या नाही, म्हणून टोळक्याचा धुडगूस; पुण्याच्या कोंढव्यातल्या घटनेत तिघांना अटक

| Updated on: Jun 25, 2022 | 3:45 PM

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी रात्री 10.15च्या सुमारास मित्र भोजनालयात चहा घेत होते. त्यावेळी संशयीत त्याठिकाणी आले. या संशयितांनी त्यांच्याशी दारू पिण्यासाठी खुर्च्या न दिल्याने वाद घातला.

Pune crime : दारू पिण्यासाठी खुर्च्या दिल्या नाही, म्हणून टोळक्याचा धुडगूस; पुण्याच्या कोंढव्यातल्या घटनेत तिघांना अटक
नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : दारू (Liquor) पिण्यासाठी खुर्च्या न दिल्याने टोळक्याने धुडगूस घातला आहे.कात्रज-कोंढवा बायपासवरील गोकुळनगर येथे ही घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी खुर्च्या न दिल्याने येथील एका भोजनालयात हा धुडगूस घालण्यात आला. एवढेच नाही तर चार ग्राहकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला (Attack) करण्यात आला. वाहनांची तोडफोड, भोजनालय आणि लगतच्या दुकानांवर दगडफेकही करण्यात आली. बुधवारी ही घटना घडली होती. बिबवेवाडी येथील लक्ष्मण बांगारी (23) यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक (Arrest) केली. एकूण सात आरोपी असून त्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या तिघांवर गंभीर दुखापत आणि दंगल घडवून आणल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बांगारी यांच्यासह त्यांचे मित्र या घटनेत जखमी झाले आहेत.

मारहाण आणि धमकी

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी रात्री 10.15च्या सुमारास मित्र भोजनालयात चहा घेत होते. त्यावेळी संशयीत त्याठिकाणी आले. या संशयितांनी त्यांच्याशी दारू पिण्यासाठी खुर्च्या न दिल्याने वाद घातला. बुधवारी रात्री संशयित, धारदार शस्त्रे घेऊन चार मोटारसायकलवर भोजनगृहात पोहोचले. तिथे त्यांनी गोंधळ घातला. बांगारी आणि इतरांना मारहाण केली आणि ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्लेखोरांनी शस्त्रे काढत लोकांना धमकावले आणि शिवीगाळ केली आणि स्वतःला ‘भाई’ म्हणत धुडगूस घातला. फुटपाथवर असलेल्या लोकांवर शिवीगाळ करून त्यांना तेथून पळवून लावले.

हे सुद्धा वाचा

हॉटेलबाहेरही घातला राडा

संशयितांनी वाहनांची तोडफोड केली आणि भोजनालय, परमिट रूम आणि शेजारील दुकानांवर दगडफेक केली आणि शटर खाली करण्यास भाग पाडले. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी सांगितले, की एफआयआरमध्ये नाव असलेल्या सात जणांपैकी आम्ही तिघांना अटक केली आहे. पळून गेलेल्या संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार असलेल्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.