
बंगळुरु : एका चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलीसह चौघांची तपासणी करण्यात आली. शाळेच्या आवारातून 2 हजार रुपये चोरल्याच हे प्रकरण होतं. भाषा विषयाच्या शिक्षिकेने तिच्या पर्समधून 2 हजार रुपये गायब झाल्याची तक्रार केली. त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थीनीसह चौघांची तपासणी करण्यात आली. अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तपासणी करण्यात आली. ते तिला अजिबात सहन झालं नाही. घटनेनंतर दोन दिवसांनी शनिवारी दुपारी मुलीने तिच जीवन संपवलं. उत्तर कर्नाटकातील बागलकोट येथील सरकारी शाळेत हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनीसह चौघांची तपासणी करण्यात आली होती.
मुलीला तिच्यावर झालेला हा आरोप सहन झाला नाही. ज्या पद्धतीने या सर्व प्रकाराची चौकशी झाली, त्यामुळे मुलीने आपल जीवन संपवून घेतलं. निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जवळच्या मंदिरात घेऊन जाण्याआधी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांनी मुलीला विवस्त्र करुन तिची झडत घेतली. TOI ने हे वृत्त दिलं आहे.
कुटुंबीयांनी काय सांगितलं?
मृत मुलीची मोठी बहिण सुद्धा याच शाळेत शिकते. तिने तिच्या आई-वडिलांना शाळेत काय घडलं? त्या बद्दल सांगितलं. बागलकोटचे एसपी अमरनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिली. जीवन संपवून घेणारी मुलगी खूप संवेदनशील होती. दोन दिवसापासून ती कोणाशी काही बोलत नव्हती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मुलीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला, ते समजल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून पुढाकार घेऊन तपास सुरु केला.