Goa : गोव्यात कार नदीत कोसळल्याने चौघांचा बुडून मृत्यू, अपघातामुळे गावावर शोककळा पसरली

| Updated on: Jul 29, 2022 | 12:28 PM

हा अपघात घडल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. हे शोध कार्य गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास संपले.

Goa : गोव्यात कार नदीत कोसळल्याने चौघांचा बुडून मृत्यू, अपघातामुळे गावावर शोककळा पसरली
अपघातामुळे गावावर शोककळा पसरली
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गोवा : गोव्यात (Goaकार नदीत कोसळून चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करून परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात (Car Accident) घडला आहे. तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर कार सापडली आहे. लोटलीहून कुठठालीमार्गे आगशीच्या दिशेने निघालेली डस्टर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून झुआरी नदीत कोसळली. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यात कारमधील चौघांचा ही बुडून झुआरी पुलाचा अंत झाला आहे. पती, पत्नी व दिर मिळून मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या भीषण अपघातामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली. हा अपघात घडल्यानंतर पोलीस (Goa Police) व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. हे शोध कार्य गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास संपले.

नेमकं काय घडलं

हे कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी एक ठिकाणी गेलं होतं. तिथं वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री उशिरा घरी निघालं होतं.  त्यावेळी त्याची कार अतिशय जलदगतीने होती. गाडीच्या चालकाला गाडी कंट्रोल न झाल्याने थेट नदीत कोसळली. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. कारमध्ये असणाऱ्या चौघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. झुआरी पुलाचा कठडा तोडून नदीत गेली आहे. त्यामुळे त्यांचा स्पीड अधिक असावा अशी पोलिसांना शंका आहे. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीघेजण आहेत. मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताचं संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

अंधार असल्यामुळे कार सापडत नव्हती

अपघात झाल्याची माहिती पोलिस आणि अग्नीशमक दलाला समजताचं त्यांनी तातडीने तिथं मदत करण्याचा प्रयत्न केला.  सुरुवातीला त्यांना तिथं अनेक अडचणी येत होत्या.  अंधार असल्यामुळे कार सापडत नव्हती. खूपवेळ प्रयत्न केल्यानंतर कार सापडली. त्यावेळी त्या कारमध्ये चार जणांचे मृतदेह देखील होते. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.