AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa : गोव्यात कार नदीत कोसळल्याने चौघांचा बुडून मृत्यू, अपघातामुळे गावावर शोककळा पसरली

हा अपघात घडल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. हे शोध कार्य गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास संपले.

Goa : गोव्यात कार नदीत कोसळल्याने चौघांचा बुडून मृत्यू, अपघातामुळे गावावर शोककळा पसरली
अपघातामुळे गावावर शोककळा पसरलीImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 29, 2022 | 12:28 PM
Share

गोवा : गोव्यात (Goa)  कार नदीत कोसळून चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करून परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात (Car Accident) घडला आहे. तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर कार सापडली आहे. लोटलीहून कुठठालीमार्गे आगशीच्या दिशेने निघालेली डस्टर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून झुआरी नदीत कोसळली. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यात कारमधील चौघांचा ही बुडून झुआरी पुलाचा अंत झाला आहे. पती, पत्नी व दिर मिळून मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या भीषण अपघातामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली. हा अपघात घडल्यानंतर पोलीस (Goa Police) व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. हे शोध कार्य गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास संपले.

नेमकं काय घडलं

हे कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी एक ठिकाणी गेलं होतं. तिथं वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री उशिरा घरी निघालं होतं.  त्यावेळी त्याची कार अतिशय जलदगतीने होती. गाडीच्या चालकाला गाडी कंट्रोल न झाल्याने थेट नदीत कोसळली. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. कारमध्ये असणाऱ्या चौघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. झुआरी पुलाचा कठडा तोडून नदीत गेली आहे. त्यामुळे त्यांचा स्पीड अधिक असावा अशी पोलिसांना शंका आहे. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीघेजण आहेत. मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताचं संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अंधार असल्यामुळे कार सापडत नव्हती

अपघात झाल्याची माहिती पोलिस आणि अग्नीशमक दलाला समजताचं त्यांनी तातडीने तिथं मदत करण्याचा प्रयत्न केला.  सुरुवातीला त्यांना तिथं अनेक अडचणी येत होत्या.  अंधार असल्यामुळे कार सापडत नव्हती. खूपवेळ प्रयत्न केल्यानंतर कार सापडली. त्यावेळी त्या कारमध्ये चार जणांचे मृतदेह देखील होते. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?