
Crime News : प्रेमात लोक आंधळे होतात असं म्हणतात, प्रेमात असताना बरेच वेळा असे निर्णय घेतले जातात, जे आपण घेतले नाही पाहिजेत. असं बऱ्याच वेळेस महिलांसोबत होतं कारण, त्या प्रेमात डोक्याऐवजी मनाने विचार करतात. अशीच एक कहाणी त्या महिलेची आहे, जी तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडली होती. तो होता एक मेकॅनिक. हे प्रकरण गोव्यातलं आहे. तिथे एका इमारतीत कामाक्षी नावाची 30 वर्षांची महिला रहात होती. 30 ऑगस्ट रोजी तिचे नातेवाईक तिला सतत फोन करत होते, पण कोणीच फोन उचलतं नव्हतं. अखेर तिच्या कुटुंबियांनी ओळखीच्या एका व्यक्तीला तिच्या घरी जाऊन ती ठीक आहे का हे पाहण्यास सांगितले.
त्याप्राणे ती व्यक्ती कामाक्षीच्या घरी गेली आणि बेल वाजवली. मात्र बराच वेळ कोणीच दार उघडलं नाही म्हणून त्याने दरवाजाला धक्का मारला असता, तो लगेच उघडला. आत जाऊन त्या व्यक्तीने कामाक्षीला बराच वेळ हाक मारली पण कोणीच उत्तर दिलं नाही. अचानक त्या व्यक्तीचं जमिनीकडे लक्ष गेलं, तर त्यावर त्याला रक्ताचे डाग पडलेले दिसले. हे पाहून त्याने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर त्याने तिच्या कुटुंबियांना याबाबत कळवले.
पोलिसांना देण्यात आली माहिती
कामाक्षी सापडत नसल्याचे ऐकून कुटुंबियांचे धाबे दणाणले आणि त्यांनी तातडीने गोवा गाठून, मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत तिची माहिती गोळा केली. ती कुठे आणि काय काम करते, या फ्लॅटमध्ये कधीपासून राहते, असे अनेक प्रश्न वितारत त्यांनी माहिती एकत्र करण्यास सुरूवात केली. तुमचा कोणावरही संशय आहे का, असा प्रश्न पोलिसांनी विचारताच कुटु्ंबियांनी सांगितले की त्यांच्या मुलीची, कामाक्षी हिची एका २२ वर्षीय तरूणाशी मैत्री होती. यावरून पोलिसांना थोडा लीड मिळाला आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला असता जी माहिती समोर आली त्याने सर्वांनाच धक्का बसला. कामाक्षी हिने गायब होण्याच्या एका दिवसापूर्वीच त्या तरूणाविरोधात तक्रार दाखल केली होती.
नक्की काय झालं ?
प्रकाश नावाचा तरूण आपल्याला खूप त्रास देत असल्याचे सांगत कामाक्षीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांना सुगावा मिळाला आणि त्यांनी प्रकाशला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. त्यादरम्यान प्रकाशने पोलिसांना सांगितले की कामाक्षी हिने तक्रार दाखल केल्यानंतर आता तिला कधीच भेटायचे नाही, असे आपण ठरवले होते. पण पोलिसांना त्याचं बोलणं पटलं नाही, कुठेतर पाणी मुरतंय असा संशय त्यांना वाटत होता. त्यांनी प्रकाशचे कॉल डिटेल्स शोधून काढले आणि त्याने शेवटचा कॉल कामाक्षी हिलाच केल्याचे त्यातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवत पुन्हा चौकशी केली असता, त्याने सर्व रहस्य उलगडले.
प्रकाशने उलगडले गुपित
प्रकाश हा पेंटर आणि मेकॅनिक म्हणून काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याची कामाक्षी हिच्याशी ओळख झाली आणि ती वाढली. नंतर ते वरचेवर भेटायला लागले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर कामाक्षी त्याच्यापासून दूर राहू लागली. प्रकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे लक्षात आल्यानेच कामाक्षीने हे पाऊल उचलले. मात्र प्रकाशला कामाक्षीपासून दूर रहायचे नव्हते, तो सतत तिचा पाठलाग करू लागला.
अनेकवेळा समजावूनही प्रकाश ऐकायला तयार नसल्याचे पाहून कामाक्षीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. हे समजताच प्रकाश तिच्या घरी गेला व तिची समजूत काढण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र ती काहीच ऐकायला तयार नव्हती, हळूहळू दोघांमध्ये सुरू झालेला वाद वाढला. आणि रागाच्या भरातच प्रकाशने कामाक्षीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह महाराष्ट्रातील आंबोली घाटात फेकून दिला. मात्र तिच्या घरातील रक्ताच्या डागावरून पोलिसांना सुगावा लागला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रकाशला अटक केली असून कामाक्षीचा मृतदह शोधण्यात येत आहे.