आईच्या डोक्यात गुप्तधनाचे खुळ शिरले, गुप्तधनासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेली, मग मुलगा संतापला अन्…

| Updated on: Jun 09, 2023 | 9:52 AM

महिलेला गुप्तधन शोधण्याचे खुळ होते. याच खुळापायी ती अंधश्रद्धेच्या आहारी गेली. यासाठी सर्व कमाई काळ्या जादूवर खर्च करत होती. यावरुन माय-लेकांमध्ये वाद होत होते.

आईच्या डोक्यात गुप्तधनाचे खुळ शिरले, गुप्तधनासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेली, मग मुलगा संतापला अन्...
गोंदियात मुलाकडून आईची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

गोंदिया : गोंदियात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने आणि आई अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे संतापलेल्या मुलाने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. संध्या महेंद्र कोरे असे मयत महिलेचे नाव आहे. 7 जून रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान गोंदिया शहरातील चंद्रशेखर वार्डमध्ये ही घटना घडली. मुलाने आईची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. महिलेचा भाऊ प्रकाश कवळुजी पाथोडे याच्या रिपोर्टवरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये दाखल करण्यात आला होता. आईची हत्या करुन दिशाभूल करण्यासाठी मुलाने स्वतःवरही जखमा करुन घेतल्या होत्या.

अंधश्रद्धा आणि चारित्र्याच्या संशयातून आईची हत्या

मयत संध्या कोरे या आमगाव रोडवरील खालसा ढाब्यावर कॅशियर म्हणून काम करत होत्या. तर त्यांचा मुलगा करण महेंद्र कोरे हा नागपुरात एमआर शिप म्हणून कामाला होता. मात्र 6 महिन्यांपासून आई आणि मुलगा श्रीनगर येथील चंद्रशेखर वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. महिलेच्या पतीचा 20 वर्षापूर्वी आजारपणाने मृत्यू झाला होता. संध्या कोरे हिचा काळ्या जादूवर विश्वास होता. गुप्तधन शोधण्यासाठी ती जमा झालेली रक्कम अंधश्रद्धेत खर्च करत होती. तसेच आरोपीला त्याच्या आईच्या चारित्र्यावरही संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होता.

आरोपी मुलगा अटक

घटनेच्या दिवशी दोघेच घरी होते. त्याच रात्री मनात राग मनात ठेवून पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान मुलाने आईचा गळा चिरला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला तर आरोपी तरुण सोफ्यावर गंभीर अवस्थेत बसलेला आढळून आला. त्याच्या हाताला जखम होती. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर मुलाकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा