लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी; हादरवणारा Video

लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन अज्ञातांनी हा हल्ला केला आणि त्यानंतर ते बाईकवर पळून गेले. अमरावती जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी; हादरवणारा Video
लग्नसोहळ्यात घडली धक्कादायक घटना
Image Credit source: Tv9
| Updated on: Nov 12, 2025 | 2:14 PM

लग्नसमारंभ म्हटलं की आनंद आणि जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतं. एक जोडपं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज असतं आणि त्यांच्या या आनंदात अनेकजण सहभागी होऊन त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद देतात. पण अमरावतीतील अशाच एका लग्नसोहळ्याला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. अमरावतीमधल्या बडनेरा इथं लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बडनेरा रोडवरील साहिल लॉनवर मोठा गोंधळ निर्माण झाला. दोन तरुणांनी नवरदेव सुजलराम समुद्रेवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवसच अत्यंत वाईट आठवणीत रुपांतरित झाला. या हल्ल्यात सुजलराम समुद्रे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोळ्यांसमोर ही घटना घडताना पाहून वधूला मोठा धक्का बसला आणि ती स्टेजवरच बेशुद्ध पडली.

ड्रोन कॅमेऱ्यात घटना कैद

ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओत आरोपी स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. स्टेजवर नवरदेवावर चाकूने हल्ला केल्यानंतर दोन तरुण दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. नवरदेवाचे वडील जेव्हा आरोपींच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्यावरही चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार होतात. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर लग्नसोहळ्यात एकच खळबळ आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

आरोपींचा शोध सुरू

चाकूहल्ल्यात नवरदेव सुजलराम समुद्रे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. या हल्ल्याची माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी सुजल समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.