चौरचौघांसारखा त्यांचाही सुखी संसार सुरु होता, मग असं काय झालं की या सुखात मीठाचा खडा पडला !

इतर जोडप्यांप्रमाणे त्या्चाही सुखी संसार सुरु होता. इतरांप्रमाणे त्यांच्याही संसारात छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ लागल्या. पण या कुरबुरी इतके भयंकर ठरतील याची त्यांनाही कल्पना आली नसेल.

चौरचौघांसारखा त्यांचाही सुखी संसार सुरु होता, मग असं काय झालं की या सुखात मीठाचा खडा पडला !
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Apr 08, 2023 | 9:00 PM

सोनीपत : कौटुंबिक कलहाने दोन जीवांचा बळी घेतल्याने हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एका विवाहित तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादातून टोकाचे पाऊल गाठले. कौटुंबिक वादामध्ये आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या केली. रात्री हत्या केल्यानंतर सकाळी आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठले आणि या हत्याकांडाची कबुली दिली. पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. गोपालपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. शमशेर असे आरोपी पतीचे नाव आहे.

अचानक सुखी संसारात वाद होऊ लागले

खरखोदा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर गावात आरोपी शमशेर आपली पत्नी आणि मुलासह राहत होता. चारचोघांसारखा दोघांचा संसार अगदी सुखात चालला होता. मात्र त्यांच्या या सुखी संसाराला नजर लागली आणि त्यांच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या. या कुरबुरी इतक्या वाढल्या की, त्यांच्यात दररोज भांडण होऊ लागले अन् अखेर हे भांडण विकोपाला जाऊन नको ते होऊन बसले.

रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला समशेरचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाले. या दाम्पत्यामध्ये दररोज या-ना-त्या कारणावरून वाद व्हायचे. रोजच्या कटकटीला कंटाळून अखेर शुक्रवारी मध्यरात्री पत्नीला कायमचे संपवण्याचा विचार शमशेरच्या डोक्यात आला. याच क्रूर विचारातून त्याने पत्नीसह मुलाला कायमचे संपवले. हत्येनंतर दोघांचेही मृतदेह रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळ होताच शमशेरने पोलीस गाठत गुन्ह्याची कबुली दिली. हत्येत वापरलेले हत्यारही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Follow Us