पित्याने पाच वेळा केलं लग्न, पण मुलगी प्रेमात पडणे त्याला मंजूरच नव्हतं ! उचलले भयानक पाऊल, सर्वच हादरले

| Updated on: Jun 02, 2023 | 6:14 PM

Crime Against Women : 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी 5 दिवसांनी कबर खोदून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपासात हे प्रकरण ऑनर किलिंगचे निघाले,.

पित्याने पाच वेळा केलं लग्न, पण मुलगी प्रेमात पडणे त्याला मंजूरच नव्हतं ! उचलले भयानक पाऊल, सर्वच हादरले
Follow us on

ऊधम सिंह नगर : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात ऑनर किलिंगची (Honor Killing)धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पाच दिवसांनी कबर खोदून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत मुलीच्या मामाच्या तक्रारीवरून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही अल्पवयीन मुलगी रहस्यमय परिस्थितीत मृत आढळून आली. तपासात हे प्रकरण ऑनर किलिंगचे निघाले, त्यानंतर पोलिसांनी घटनेचा खुलासा करताना मृत मुलीच्या वडिलांना अटक केली. मात्र या हत्येमध्ये सहभागी असलेल्या मुलीचा भाऊ अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

या खुनाचा खुलासा करताना एसपी क्राईम चंद्रशेखर घोडके यांनी सांगितले की, एका इसमाने पोलिसांत येऊन तक्रार केली की त्याची भाची सोनी (१४) हिला तिचे वडील झाकीर हुसेन आणि भाऊ युनूस यांनी २२ मे रोजी मारले संध्याकाळी मारले. आणि रात्रीच स्मशानभूमीत दफन केले. त्या इसमाने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि दंडाधिकार्‍यांच्या परवानगीने त्या मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि पंचनामा झाल्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे कारण पोस्टमॉर्टम मध्ये समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी ऑनर किलिंगच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला.

एसपी क्राईम चंद्रशेखर घोडके यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून, एसओ कमलेश भट्ट यांचे पथक दादिया जिल्हा बरेली येथे पाठवण्यात आले, तेथून पोलिसांनी मुख्य आरोपी झाकीर हुसेनला अटक केली. झाकीरने पोलिस चौकशीत सांगितले की, त्याने पाचवेळा लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून त्याला तीन मुले आणि एक मुलगी अशी एकूण चार मुलं होती.

त्यांची मुलगी सोनी हिचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या मुलाशी फोनवर बोलायची. सोनीला समजवल्यानंतरही तिने न ऐकल्याने तिच्या वडीलांनी भावासह मिळून गळा आवरून तिचा खून केला. पोलिसांचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच अन्य आरोपी युनूसलाही अटक करण्यात येईल. झाकीरला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.