AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षांतराला वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ
उद्धव ठाकरे यांना धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 18, 2025 | 2:47 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पक्षांतराला वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू झालं आहे. आज काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील भाजपनं मोठा धक्का दिला आहे, बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं शिवसेना ठाकरे गटासाठी मोधा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे, महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, पक्षाला लागलेली ही गळती रोखण्याचं मोठं आवाहन आता शिवसेना ठाकरे गटापुढे असणार आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.  तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेसला देखील मोठा धक्का दिला आहे, आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.