AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्याबद्दल सर्वकाही

या गुगल पे कार्डद्वारे ग्राहकांना त्यांचे महिन्याचं बिल ते इतर वस्तुंचे देखील बिल भरता येणार आहे. चला तर मग Google Pay च्या या कार्डचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊयात.

Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्याबद्दल सर्वकाही
Google Pay credit card
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 2:47 PM
Share

गुगलने अखेर त्यांचे पहिले जागतिक क्रेडिट कार्ड लाँच केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते भारतात पहिल्यांदा सादर केले जात आहे. गुगल पेने अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने RuPay नेटवर्कवर हे को-ब्रँडेड कार्ड लाँच केले आहे. आजच्या डिजिटल युगात वेगाने वाढणाऱ्या यूपीआय पेमेंट सिस्टमला मान्यता देण्यासाठी कंपनीने या कार्डमध्ये यूपीआय लिंक करण्याची देखील सुविधा केली आहे. याचा अर्थ असा की ग्राहक हे कार्ड त्यांच्या यूपीआय खात्याशी लिंक करून दुकानं आणि व्यापाऱ्यांना सहजपणे पेमेंट करू शकतात.

इन्स्टंट रिवॉर्ड्स या कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य

या गुगल पे क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे इन्स्टंट कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स. बहुतेक क्रेडिट कार्ड महिन्याच्या शेवटी कॅशबॅक देतात, परंतु गुगलने प्रत्येक व्यवहारावर इन्स्टंट रिवॉर्ड्स देऊन हा दृष्टिकोन बदलला आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढील खरेदीसाठी तुमचे रिवॉर्ड पॉइंट्स त्वरित रिडीम करू शकता.

तर या कार्ड लाँचवेळी गुगलचे वरिष्ठ संचालक शरथ बुलुसु यांनी सांगितले की, ग्राहकांना रिवॉर्ड्स रिडीम करण्यात जास्त त्रास होऊ नये म्हणून कंपनीने या फीचरवर विशेषतः काम केले आहे.

वेगाने वाढणाऱ्या डिजिटल युगात गुगल क्रेडिट कार्डची एँट्री

भारतात UPI आणि क्रेडिट कार्डच्या एकत्रित वापराची मागणी वेगाने वाढत आहे. फोनपे, एसबीआय कार्ड्स आणि एचडीएफसी सारख्या प्रमुख कंपन्यांनी आधीच त्यांचे स्वतःचे RuPay कार्ड लाँच केले आहेत. 2019 मध्ये पेटीएमने हे सर्वप्रथम लाँच केले होते. या बाजारात Cred आणि super.money देखील सक्रिय आहेत.

आजच्या तीव्र स्पर्धेदरम्यान गुगलचा प्रवेश भारतीय वित्तीय बाजारपेठेत अधिक काळ टिकण्याची कंपनीची इच्छा दर्शविले आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्ड सध्या UPI शी जोडले जाऊ शकत नाहीत या वस्तुस्थितीमुळे देखील ही उत्सुकता वाढली आहे.

ईएमआय आणि सोपे पेमेंट

याव्यतिरिक्त हे गुगल पे कार्ड ग्राहकांना त्यांचे महिन्याचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देते. ग्राहक सहा किंवा नऊ महिन्यांत सोप्या हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकतात. एकूणच, भारतातील फक्त 20% लोकांना क्रेडिटची सुविधा उपलब्ध आहे. गुगल पेच्या या हालचालीमुळे देशाच्या विशाल बाजारपेठेत क्रेडिट कार्डचा प्रवेश वाढू शकतो.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.