दोघी बहिणी वारंवार घरुन पळून जायच्या, माता-पित्यांसह सर्वच हैराण, मग जे घडले ते भयंकर

मुलींच्या वागण्यामुळे आई-वडिलांसह सर्वच कुटुंबीय हैराण झाले होते. मुली वारंवार घरुन पळून जायच्या. यामुळे आई-वडिलांनाही लज्जास्पद वाटत होते. अखेर आई-वडिलांनी यावर कायमचा तोडगा काढण्याचे ठरवले.

दोघी बहिणी वारंवार घरुन पळून जायच्या, माता-पित्यांसह सर्वच हैराण, मग जे घडले ते भयंकर
गाडी लुटण्यासाठी त्यांनी कॅब चालकालाच संपवले
Image Credit source: Google
वैजंता गोगावले | Updated on: Apr 15, 2023 | 7:59 PM

वैशाली : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केके सराय पोलीस स्टेशन परिसरात दोन बहिणींच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. सराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणी भाकुर्हर गावात आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलींचा जीव घेतला आहे. घटनेनंतर वडील फरार झाले असून, आईला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवले. आईने पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे.

मुलींच्या हत्येनंतर आरोपी बाप फरार

मणी भाकुर्हर गावात दोन बहिणींच्या हत्येची नोंद झाली असून वडिलांवर हत्येचा संशय आहे, मात्र तो फरार आहे. हे संपूर्ण प्रकरण ऑनर किलिंगचे आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना पाहताच आरोपी बाप नरेश भगत घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई रिंकू देवी हिला ताब्यात घेतले. मृत बहिणींमध्ये मोठ्या बहिणीचे वय अंदाजे 18 वर्षे असून लहान बहिणीचे वय 16 वर्षे आहे.

मुली वारंवार घरातून पळून जायच्या म्हणून हत्या

आरोपी बाप नरेश भगत कोलकाता येथे नोकरीनिमित्त राहतो. तर आई रिंकूदेवी दोन मुलींसह वैशाली जिल्ह्यातील मणी भाकुर्हर गावात राहतात. पोलीस चौकशीत आईने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली वारंवार घरातून पळून जात होत्या. त्यामुळे सर्वजण नाराज होते, याच कारणातून दोघींची हत्या करण्यात आली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस आरोपी बापाचा शोध घेत आहेत. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us