AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम कपूरने ओलांडल्या मर्यादा, 22 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला किस; अखेर पत्नीने हात जोडून मागितली माफी

'लॉक अप 2'मधील स्पर्धकांना भेटायला त्यांचे कुटुंबीय आले आहेत. यावेळी अभिनेता राम कपूरची पत्नी गौतमी कपूर ही श्रेया कालराची हात जोडून माफी मागते. श्रेयाने राम कपूरवर गैरवर्तनाचे आरोप केले होते. गौतमी तिला नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

राम कपूरने ओलांडल्या मर्यादा, 22 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला किस; अखेर पत्नीने हात जोडून मागितली माफी
श्रेया कालरा-राम कपूर, गौतमी कपूरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 11:41 AM
Share

भरभरून ड्रामा आणि मनोरंजनाच्या डोसदरम्यान आता ‘लॉक अप 2’ हा सिझन अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेपूर्वी त्यातील स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला लॉकअपमध्ये पोहोचले. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता राम कपूर या सिझनमध्ये त्याच्या वादग्रस्त वागण्या-बोलण्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. शोदरम्यान त्याने इन्फ्लुएन्सर श्रेया कालराला बळजबरी किस केलं होतं. यानंतर आता लॉक अपमध्ये पोहोचलेल्या त्याच्या पत्नीने श्रेयाची माफी मागितली आहे. या शोमध्ये श्रेयाने अनेकदा राम कपूरच्या वागणुकीबद्दल आक्षेप नोंदवला होता. रामने सतत किस करणं मला पसंत नाही, असं तिने म्हटलं होतं. यावर आता रामची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरने हात जोडून तिच्या पतीच्या वागणुकीबद्दल माफी मागितली आहे.

गौतमी हात जोडून श्रेयाला म्हणाली, “जर त्याने तुला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असेल तर, जर त्याने तुझ्यावर थुकलं असेल तर त्याच्या बाजूने मी तुझी माफी मागते.” 30 वर्षीय श्रेया कालराने 52 वर्षीय राम कपूरवर अनेकदा मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला होता. एका एपिसोडमध्ये तिने थेट म्हटलं होतं, “राम कपूरने जर मला पुन्हा किस करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला स्पष्ट शब्दांत सांगेन की माझे पप्पाही मला इतके किस करत नाहीत.” श्रेयाच्या या वक्तव्यानंतर गौतमीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिचं मत मांडलं होतं.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by @realitywibes

“खरंतर लॉकअप या शोबद्दल मी काहीच बोलणार नाही, असं ठरवलं होतं. पण गेल्या काही दिवसांतील प्रकार पाहून मी शांत राहू शकले नाही. म्हणूनच मी माझ्या पतीच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. अनेकजण राम कपूरला ‘ठरकी’ (सतत मुलींशी फ्लर्ट करणारा) म्हणत आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते की, तो असाच आहे. त्याचं मन खूप मोठं आहे. या शोमध्ये तो कोणत्याही प्लॅन किंवा स्ट्रॅटेजीशिवाय गेला आहे. म्हणून लोकांना त्याचं वागणं खटकतंय. राम खूपच दयाळू आणि प्रेमळ आहे. त्याने कित्येकांची मदत केली आहे. एखाद्या व्यक्तीला जवळून ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल मत बनवणं किती सोपं असतं. हा खेळ फक्त मनाने नाही तर मेंदूनेही खेळा”, असं गौतमी म्हणाली होती.

Follow Us
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश