मी तुझ्या बायकोसोबत आहे; नवऱ्यानं रंगेहाथ पकडूनही ती थांबली नाही… नेमकं काय घडलं?

मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला रंगेहात पकडले होते. तरीही ती सुधारली नाही. मात्र, पतीने टोकाचे पाऊल उचलले.

मी तुझ्या बायकोसोबत आहे; नवऱ्यानं रंगेहाथ पकडूनही ती थांबली नाही... नेमकं काय घडलं?
Crime news
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 23, 2025 | 5:33 PM

मुंबईच्या चुनाभट्टी पोलिसांनी एका बाईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या बाईनं तिच्या नवऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. ही तक्रार मृताच्या वडिलांनी जे रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल आहेत यांनी केली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

काय आहे प्रकरण?

सिद्देश रत्ने यानं १८ एप्रिल २०२५ रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी तक्रार केली की सिद्देशची बायको मानसी रत्ने आणि तिचा कथित प्रियकर युवराज जाधव यांनी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. सिद्देश आणि मानसीचं लग्न २०२० मध्ये झालं होतं, पण त्यांच्या नात्यात सतत तणाव होता.
वाचा: माझ्या बायकोचे 4 बॉयफ्रेंड, मोठ्या मुलाला…; पोस्टरवर दुखः, वैतागलेल्या पती थेट कलेक्टरकडे

नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं

तक्रारीनुसार, मानसीचे अनेकांशी अनैतिक संबंध होते, ज्यामुळे सिद्देशला मानसिक त्रास सहन करावा लागला. एकदा सिद्देशनं मानसीला एका माणसासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं, पण त्यानं तिला माफ केलं. तरीही मानसीचे कथित संबंध चालूच राहिले, ज्यामुळे सिद्देशची मानसिक अवस्था आणखी खराब झाली.

पोलिसांचा तपास काय सांगतो?

पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय. सिद्देशच्या मोबाइलमधून मिळालेले व्हिडिओ आणि मेसेज तपासले जात आहेत. या मेसेजमध्ये युवराज जाधव यानं सिद्देशला आत्महत्येसाठी उकसवणारे मेसेज पाठवले होते, असं समोर आलंय. पोलिसांनी मानसी रत्ने आणि युवराज जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस आणखी पुरावे गोळा करत आहेत आणि लवकरच या दोघांना अटक होऊ शकते. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सिद्देशच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.