माझ्या बायकोचे 4 बॉयफ्रेंड, मोठ्या मुलाला…; पोस्टरवर दु:ख, वैतागलेला पती थेट कलेक्टरकडे
साहेब! माझ्या बायकोने आतापर्यंत चार बॉयफ्रेंड बनवले आहेत. सध्या ती एका प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. मला तर भीती वाटते की कदाचित… एक पती थेट कलेक्टरकडे गेला.

साहेब! माझ्या बायकोने आतापर्यंत चार बॉयफ्रेंड बनवले आहेत. सध्या ती एका प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. मला तर भीती वाटते की कदाचित… इतके बोलताच अमित सेन रडू लागला. अमितने आपली संपूर्ण कहाणी एका पोस्टरवर लिहिली होती आणि त्यासोबत पत्नीचे फोटो लावले होते. हा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे घडला आहे. अमितने पत्नीवर गंभीर आरोप करताना सांगितले की, पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडमुळे त्याच्या जीवाला धोका आहे.
हे प्रकार मध्य प्रदेशमधील जनकपुरी परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या अमित सेनने ग्वालियरच्या कलेक्टर रुचिका चौहान यांना एक पोस्टर दाखवले. ते पाहून कलेक्टरही थक्क झाल्या. कारण पोस्टरमध्ये पीडित पती अमित सेनने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले. त्याने म्हटले की, तिने आतापर्यंत 4 बॉयफ्रेंड बनवले आहेत. सध्या ती घर सोडून राहुल बाथम नावाच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अमितचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून त्याच्या मोठ्या मुलाची, हर्षची हत्या केली आहे. तसेच, लहान मुलाला घेऊन ती बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. जेव्हा त्याने याचा विरोध केला, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड त्याला ठार मारण्याची धमकी देत आहे. वाचा: ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठे वळण! वडिलांनी घेतला यूटर्न, म्हणाले…
अमितला शंका आहे की, मेरठमधील सौरभ ड्रम हत्याकांडाप्रमाणे त्याचाही खून होऊ शकतो. तसेच त्याने तक्रार केली तर गोळी घालून हत्या करु अशीही धमकी दिली. पत्नीच्या वागण्याला त्रस्त असलेल्या पती अमित सेनचे असेही म्हणणे आहे की, जेव्हा तो नोकरी करत होता, तेव्हा त्याची पत्नी त्याच्याकडून दरमहा पैसे घेऊन दारू आणि सिगारेटच्या मौजमजेसाठी खर्च करायची. याचे व्हिडिओही त्याच्याकडे आहेत. त्याने या सर्व गोष्टींची तक्रार पोलिस स्टेशन आणि एसपी कार्यालयात अनेकदा केली आहे, पण त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. अशा परिस्थितीत आता त्याला न्याय मिळाला नाही तर तो आत्महत्या करण्यास भाग पडेल असे म्हणत आहे.
कलेक्टरने प्रकरणात काय सांगितले?
ग्वालियरच्या कलेक्टर रुचिका चौहान यांनी पत्नीने त्रस्त केलेल्या पती अमित सेनचे दु:ख ऐकून त्याला न्याय मिळेल, असे आश्वासन दिले आहे. कलेक्टर रुचिका चौहान यांचे म्हणणे आहे की, हा पती-पत्नीमधील वादाशी संबंधित प्रकरण आहे. अशा परिस्थितीत पहिली प्राथमिकता ही असेल की, दोघांची फॅमिली काउंसलरमार्फत समुपदेशन केले जाईल आणि त्यांचे घर तुटण्यापासून वाचवले जाईल. मेरठच्या सौरभ ड्रम कांडानंतर मध्य प्रदेशासह देशभरात अनेक पत्नीमुळे त्रस्त असलेल्या पतींच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ज्यांनी आपल्या पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यापैकीच एक अमित सेननेही आपले दु:ख व्यक्त केले आहे.
