ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठे वळण! वडिलांनी घेतला यूटर्न, म्हणाले…
पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणात नवीन वळण आलं आहे. यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी, हरीश मल्होत्रांनी, आधी तिच्या पाकिस्तान दौऱ्यांचा बचाव केला होता, पण आता त्यांनी यूटर्न घेतला आहे.

‘ट्रॅव्हल विथ JO’ नावाचं यूट्यूब चॅनल चालवणारी ज्योती मल्होत्राला 17 मे रोजी अटक करण्यात आली. हरियाणा पोलिसांनी हिसारमध्ये तिला पाकिस्तानी एजन्सींसाठी कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडलं. सध्या ती पोलिस रिमांडमध्ये आहे. तिच्यावर 100 प्रश्नांचा मारा करण्यात आला आहे. याशिवाय, असा खुलासा झाला आहे की ती दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगामला गेली होती. ती अनेकदा पाकिस्तान आणि एकदा चीनला जाऊन आली आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला काही माहिती दिली होती. पण आता त्यांनी यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळते.
वडिलांचा यूटर्न
ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणात तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी यूटर्न घेतला आहे. ते म्हणाले, “ती मला सांगायची की ती दिल्लीला जात आहे. तिने मला कधीच काही सांगितलं नाही.” यापूर्वी हरीश मल्होत्रा यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांची मुलगी ज्योती मल्होत्रा व्हिडिओ शूटिंगसाठी पाकिस्तानला गेली होती. पण आता त्यांनी थेट यूटर्न घेतला आहे. वाचा: ज्योती मल्होत्रा सोडा… ISIच्या एजंटला हेरगिरी करणाऱ्यासाठी पाकिस्तान किती पैसे देते? वाचून व्हाल चकीत
वृत्तसंस्थेशी बोलताना ज्योतीचे वडील हरीश म्हणाले, “तिचा कोणताही मित्र आमच्या घरी आला नाही. काल पोलिस तिला इथे घेऊन आले होते. ती 15 मिनिटं थांबली. तिने तिचे कपडे घेतले आणि निघून गेली. तिने मला काहीच सांगितलं नाही. मला काय बोलावं हे समजत नाही. ती घरी व्हिडिओ बनवायची. मी कधीच सांगितलं नाही की ती पाकिस्तानला गेली, ती मला सांगायची की ती दिल्लीला जाते. माझी कोणतीही मागणी नाही, जे होईल ते होईल.”
ज्योतीच्या वडिलांनी आधी काय सांगितलं?
विशेष बाब म्हणजे, ज्योतीचे वडील हरीश यांनी शनिवारी तिचा बचाव केला होता. तिच्या अटकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारलं होतं की, तिला पाकिस्तानात राहणाऱ्या तिच्या मित्रांशी संपर्क साधण्याची परवानगी का दिली जाऊ नये? वृत्तसंस्था ANIशी बोलताना हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, “ती यूट्यूब व्हिडिओ बनवायची. ती पाकिस्तान आणि इतर ठिकाणी जायची. तिथे तिचे काही मित्र असतील तर ती त्यांना फोन करू शकत नाही का? माझी कोणतीही मागणी नाही, पण आमचे फोन परत द्या. आमच्यावर खटला दाखल झाला आहे.”