धक्कादायक, लैंगिक हल्ला प्रकरणातील आरोपीने तुरुंगात स्वत:च गुप्तांग कापलं

अब्दुल राशिदने त्याला वॉशरुमला जायच असल्याच सांगितलं. दुखापतीची गंभीरता लक्षात घेऊन त्याला जोधपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं.

धक्कादायक, लैंगिक हल्ला प्रकरणातील आरोपीने तुरुंगात स्वत:च गुप्तांग कापलं
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 12:26 PM

लैंगिक जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका 35 वर्षीय आरोपीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने रेझर ब्लेडने स्वत:च गुप्तांग कापलं. अब्दुल राशीद असं आरोपीच नाव आहे. तुरुंगातच त्याने स्वत: जवळच्या रेझर ब्लेडने गुप्तांग कापलं. रक्तस्त्राव सुरु झाल्यानंतर त्याला पोखरण येथील रुग्णालयात नेण्यात आलं. दुखापतीची गंभीरता लक्षात घेऊन त्याला जोधपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण पोलीस स्टेशनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

सहाय्यक पोलीस अधीक्षक गोपाळ सिंह भाटी, उप पोलीस अधीक्षक भवानी सिंह, पोखरण पोलीस स्टेशनचे SHO राजूराम विष्णोई यांनी घटनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. “रविवारी रात्री 10 च्या सुमारास पोखरण रोड वे ज च्या बस स्टँडवरुन राशिदला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. अब्दुल राशिदने त्याला वॉशरुमला जायच असल्याच सांगितलं. सोमवारी सकाळी एक कॉन्स्टेबल त्याच्यासोबत गेला. अब्दुलकडे रेझर ब्लेड होता. आतमध्ये गेल्यानंतर त्याने गुप्तांग कापलं” असं विष्णोई म्हणाले.

इतरांना त्रास देण्याचा स्वभाव

अब्दुल राशीद पोखरणपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पायुपाडीया गावचा निवासी आहे. नेहमीच इतरांना त्रास देण्याचा त्याचा स्वभाव असल्याच पोलिसांनी सांगितलं. राशिद त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. त्याचं लग्न झालय. पण पत्नी सोडून गेली असं अधिकाऱ्याने सांगितलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.