पत्नी जेवण वाढायला उठली नाही म्हणून पतीला अनावर झाला, मग त्याने जे केले त्यानंतर पत्नी थेट…

पती रात्री उशिरा घरी आला. त्याने झोपलेल्या पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. वारंवार आवाज देऊनही पत्नी उठली नाही. मग पतीला संताप अनावर झाला.

पत्नी जेवण वाढायला उठली नाही म्हणून पतीला अनावर झाला, मग त्याने जे केले त्यानंतर पत्नी थेट...
मनाविरोधात लग्न केल्याने मुलीच्या बापाने जावयाला संपवले
| Updated on: Mar 16, 2023 | 11:39 AM

रायगढ : पत्नीने जेवण वाढले नाही म्हणून संतापलेल्या पतीने काठीने बेदम मारहाण करत तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडमधील रायगढमध्ये घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी कसून शोध घेत त्याला अटक केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली काठीही जप्त केली आहे. न्यायालयाने आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी रात्री उशिरा कामावरुन घरी आला. तो आला तेव्हा पत्नी गाढ झोपेत होती. त्याने पत्नीला आवाज दिला आणि जेवण वाढण्यास सांगितले. पत्नी उठली नाही म्हणून त्याने वारंवार तिला आवाज दिला. तरीही पत्नी उठली नाही. यामुळे आरोपी चांगलाच संतापला. त्याने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मग दांड्याने तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर जंगलात लपला

पत्नीची हत्या केल्यानंतर पती तेथून पळून गेला आणि जंगलात लपून बसला होता. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर आरोपीचा शोध घेत जंगलातून त्याला अटक केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.