AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ वारंवार फोन करत होता तो उचलत नव्हता, अखेर त्याने पोलिसांसह घर गाठले, दरवाजा उघडला अन् पायाखालची जमीनच सरकली !

पुण्यातीव औंध परिसरात एका निवासी इमारतीत एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पती-पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह आढळले.

भाऊ वारंवार फोन करत होता तो उचलत नव्हता, अखेर त्याने पोलिसांसह घर गाठले, दरवाजा उघडला अन् पायाखालची जमीनच सरकली !
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 15, 2023 | 6:25 PM
Share

पुणे / अभिजीत पोते : पुण्यातील औंध परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळजनक माजली आहे. औंध परिसरात एका इमारतीत तीन जणांचे मृतदेह आढळून आले. नवरा बायको आणि मुलगा अशा तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही हत्या आणि आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते जोडपे

आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि 8 वर्षीय मुलाची पॉलिथिन बॅगने गळा दाबून हत्या केली. त्यांनर स्वतः गळफास घेतला असल्याची माहिती सामोर येत आहे. हे जोडपे मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून पुण्यात एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता. सुदिप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्या 44 वर्षीय इंजिनिअरचे नाव आहे. त्याने 40 वर्षीय पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली आणि 8 वर्षाच्या मुलाचा हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

‘अशी’ उघड झाली घटना

गांगुली याचा बंगलोर येथे राहणारा भाऊ मंगळवारी रात्री त्याला फोन करत होता. मात्र तो फोन उचलत नव्हता. बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला. बुधवारी दुपारी पोलिसांनी सुदिप्तो गांगुली याचे औंध परिसरातील घर गाठले. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता 3 मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सुदिप्तोने कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून नोकरी करत होता.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील