डॉक्टर आहे की हैवान?, उपचारासाठी आलेल्या महिलेला मारहाण करत केस ओढले

| Updated on: Nov 10, 2022 | 2:39 PM

या संपूर्ण प्रकरणावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश मेश्राम यांनी सांगितले की, डॉक्टरची ओळख पटली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

डॉक्टर आहे की हैवान?, उपचारासाठी आलेल्या महिलेला मारहाण करत केस ओढले
कामाचा पगार मागणाऱ्या अल्पवयीन मुलीची हत्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोरबा : रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या स्ट्रेचरवर झोपवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. कोरबा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील महिलेसोबत हा संतापजनक प्रकार उघडकीस आली आहे. घटनेवेळी डॉक्टर नशेत होता. रुग्णालय व्यवस्थापनाने या प्रकरणाची दखल घेत डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मद्यधुंद डॉक्टरकडून महिलेला रानटी वागणूक

गेरवणी गावातील एक महिलेला रक्तदाबाचा त्रास होत होता. यासाठी उपचार करण्यासाठी महिला कोरबा जिल्हा रुग्णालयात ती रात्री उशिरा आली होती. रात्री ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने तिच्यावर उपचार करण्याऐवजी महिला रुग्णाला रानटी वागणूक दिली.

मात्र नशेत असलेला डॉक्टर उपचार करत असताना डॉक्टर महिलेच्या गालावर सतत चापट मारत होता. तो एवढ्यावरच नाही थांबला तर महिलेचे केसही ओढत होता. डॉक्टरच्या या कृत्यावर महिलेच्या मुलाने आक्षेप घेतला, मात्र डॉक्टर कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

हे सुद्धा वाचा

घटना घडत असताना तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

रात्री उशिरा महिलेची तब्येत बिघडली

महिलेच्या मुलाच्या माहितीनुसार, रात्री उशिरा महिलेची तब्येत बिघडली. यानंतर कुटुंबीयांनी 108 आणि 112 वर संपर्क साधला. मात्र त्यांना वेळ लागेल, असे सांगण्यात आले.

यानंतर महिलेची तब्येत बिघडत असल्याचे पाहून त्यांनी तिला रिक्षाने रुग्णालयात आणले. यादरम्यान डॉक्टरने आईसोबत असे वर्तन केले. तिने विरोध केल्यावर गप्प बसण्यास सांगितले.

कारणे दाखवा नोटीस बजावली

या संपूर्ण प्रकरणावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश मेश्राम यांनी सांगितले की, डॉक्टरची ओळख पटली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.