जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणाचा काटा काढला, कुठे घडली घटना?

काही टोळकं परिसरात दहशत माजवण्याचे काम करत होते. एका तरुणाने याबाबत एकाला विचारले. यानंतर तरुणासोबत जे घडले ते भयंकर होते.

जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणाचा काटा काढला, कुठे घडली घटना?
कल्याणमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 12, 2023 | 10:04 AM

कल्याण : जुन्या वादातून भररस्त्यात तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. अमोल लोखंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. जयेश डोईफोडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. भररस्त्यात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येची घटना नोंद करण्यात आली आहे. भररस्त्यात घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश डोईफोडे हा सराईत आरोपी आहे. मयत आणि आरोपीमध्ये आधीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी मयत अमोल लोखंडे याने आरोपीच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असे विचारले. यामुळे आरोपी चिडला होता. आरोपीने याच गोष्टीचा राग मनात धरुन तरुणाचा काटा काढण्याचे ठरवले. मयत अमोल काल रात्री परिसरात उभा असताना आरोपींनी मागून येऊन त्याच्यावर हल्ला केला. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.

हत्या करुन आपल्याला मारहाण झाल्याची बनाव

अमोलची हत्या केल्यानंतर आरोपी जयेश डोईफोडे हा स्वतः कल्याण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्याला मारहाण झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला मेमो देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. काही वेळाने पोलिसांना हत्येची माहिती मिळाली. तसेच याच जयेशने ही हत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.