Crime News : दिवसाढवळ्या गँगवॉर टोळीने तरुणाचा हात कापून नेला, खळबळजनक घटनेमुळे परिसरात घबराहट

दिवसाढवळ्या 10 जणांच्या टोळीचा तरुणावर जीवघेणा हल्ला, हातचं कापून घेऊन गेले, परिसर हादरला

Crime News : दिवसाढवळ्या गँगवॉर टोळीने तरुणाचा हात कापून नेला, खळबळजनक घटनेमुळे परिसरात घबराहट
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 10, 2023 | 11:10 AM

हरियाणा : हरियाणा (Hariyana Kurukshetra) राज्यात दिवसाढवळ्या गँगवॉर (gang) टोळीने तरुणाचा हात कापून नेल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही दुर्देवी घटना ज्या व्यक्तीने पाहिली ती सुध्दा भयभीत झाली आहे. नेमका कोणत्या टोळीने हा प्रताप केला आहे याची पोलिस (Hariyana police)चौकशी करीत आहेत. आतापर्यंत एक डझनभर संशयितांची चौकशी झाली असून एका टोळीने हे कृत्य केले असावे अशी पोलिसांना शंका आहे.

ज्यावेळी तरुणावरती एका गॅंगने हल्ला केला, त्यावेळी त्यांच्याकडे धारधार हत्यारं होती. त्याचबरोबर तरुणाला बेदम मारहाण केली. टोळीमध्ये साधारण दहा ते बारा जण असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिली आहे. विशेष टोळी तरुणाचा हात घेऊन गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहिल्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केलं.

ज्या तरुणावर हल्ला झाला आहे. त्याचं आणि अन्य टोळीतील लोकांचं भांडण आहे. तरुणावरती लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे प्रकरण टोळीयुद्धाशी जोडले जात असून, त्यात लॉरेन्स विश्नोईच्या लोकांवर तरुणाने संशय व्यक्त केला आहे. तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटिव्ही तपासण्यात येत आहेत.