पार्टीसाठी दीड हजार रुपये दिले नाही, निर्दयी मुलाने अख्खे कुटुंबच…, घटना ऐकून अंगावर काटा येईल !

| Updated on: May 11, 2023 | 8:21 PM

मुलाने आईकडे पार्टीसाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला. मुलाला संताप अनावर झाला. मग त्याने जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

पार्टीसाठी दीड हजार रुपये दिले नाही, निर्दयी मुलाने अख्खे कुटुंबच..., घटना ऐकून अंगावर काटा येईल !
पार्टीला पैसे दिले नाही म्हणून मुलाने आई-वडिलांसह मुलाला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

सागर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक सनसनाटी घटना उघडकीस आली आहे. केवळ दीड हजार रुपयांसाठी अल्पवयीन मुलाने आई-वडिलांसह भावाची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मकरोनिया पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगरमधील एका घरातून 3 मृतदेह सापडले. पोलीस तपासात 17 वर्षीय मुलाला वेलफेयर पार्टीसाठी पैशांची गरज असल्याचे समोर आले आहे. पैसे न मिळाल्याने त्याने आई, वडील आणि भावाची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले.

पार्टीला पैसे दिले नाही म्हणून आई-वडिलांसह भावाची हत्या

आरोपी मुलाने आईकडे पैशांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आईची हत्या करुन मृतदेह आतल्या खोलीत नेऊन ठेवला. घराची साफसफाई केली. यानंतर वडील ड्युटीवरून घरी परतले. त्यांनी दरवाजा उघडताच मुलाने थेट वडिलांच्या छातीत गोळी झाडली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मग ज्या खोलीत आईचा मृतदेह होता त्याच खोलीत त्याने वडिलांचा मृतदेहही ठेवला. यानंतर भाऊ शाळेतून परतल्यावर त्याने भावाची हत्या केली आणि नंतर घराला कुलूप लावून मित्रांसोबत पार्टी करायला गेला.

मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात रवानगी

घटना उघड होताच सर्वांनाच धक्का बसला. मुलगा अल्पवयीन असल्याने विशेष पास्को कायदा न्यायालयात खटला चालवण्यात आला. विशेष सरकारी वकिलामार्फत 36 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. 129 कागदपत्रे प्रमाणित करण्यात आली होती, ज्याच्या आधारे आता आरोपी अल्पवयीन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर या अल्पवयीन मुलाला सिवनी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा