नांदेडमध्ये अंधश्रद्धेचा बळी, करणी, भानामतीच्या संशयातून वृद्धाला झाडाला बांधून अमानुष मारहाण

या प्रकरणी रामतीर्थ पोलीसांनी खून आणि जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नांदेडमध्ये अंधश्रद्धेचा बळी, करणी, भानामतीच्या संशयातून वृद्धाला झाडाला बांधून अमानुष मारहाण
nanded crime news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 04, 2023 | 8:42 AM

नांदेड : अंधश्रध्देतून नांदेड (Nanded) जिल्ह्यात एका वृ्ध्दाचा मृत्यू (Death of an old man) झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. करणी आणि भाणामती केल्याचा संशय असल्याने तीन लोकांनी वृ्ध्द इसमाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. हनुमंत पांचाळ (hanumant panchal) असं त्यांचं नाव आहे. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांची कसून चौकशी सुरु आहे. करणी भाणामती केल्याची माहिती कुणी दिली, त्याबरोबर मारहाण करण्यास कुणी सांगितले, या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिस घेत आहेत. चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे.

जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल…

अंधश्रध्देतून नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी गेला आहे, करणी आणि भानामती केल्याच्या संशयावरून तिघांनी एका वृद्धाला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या गागलेगाव येथे ही घटना घडली. गावातली वामन डूमरे यांच्या 18 वर्षीय मुलीच्या पायाला ईजा झाली होती. तिच्यावर गावातील 85 वर्षीय हनुमंत पांचाळ यांनी करणी आणि भानामती केल्याचा वामन डूमरे यांचा संशय होता. याच कारणातून बुधवारी दुपारी वामन डुमरे , त्यांचा मुलगा रत्नदीप डुमरे आणि दयानंद वाघमारे यांनी वृध्द हनुमंत पांचाळ यांना पकडून नेले. आपल्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाला बांधून त्यांना तिघांनी अमानुष मारहाण केली. नंतर गावातली मंदिराजवळ वृद्धाला आणुन फेकले. मारहाणीत हनुमंत पांचाळ यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी रामतीर्थ पोलीसांनी खून आणि जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.