AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan Crime: राजस्थानात गुरुच्या नात्याला कलंक; शिक्षकाचा वर्गातच चिमुकलीवर बलात्कार

पीडित मुलगी गावातीलच एका शाळेत शिकत आहे. मंगळवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ती शाळेत गेली होती. सायंकाळी मुलीची आई तिला घेण्यासाठी शाळेत गेली असता एका खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता.

Rajasthan Crime: राजस्थानात गुरुच्या नात्याला कलंक; शिक्षकाचा वर्गातच चिमुकलीवर बलात्कार
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 12:13 AM
Share

राजस्थान : गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना राजस्थानात घडली आहे. हल्ली शिक्षकांकडून लैंगिक शोषणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजस्थानच्या करौली येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक शाळेतील अवघ्या 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकानेच बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

नेमकी काय घटना घडली?

पीडित मुलगी गावातीलच एका शाळेत शिकत आहे. मंगळवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ती शाळेत गेली होती. सायंकाळी मुलीची आई तिला घेण्यासाठी शाळेत गेली असता एका खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. त्या खोलीला आतून कुलूप असल्याचे तिला दिसले आणि आत घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते. आरोपी शिक्षकाने मुलीच्या आईला पाहताच तात्काळ तेथून पळ काढला.

पोलिसांनी 36 तासांत केली आरोपी शिक्षकाला अटक

या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पोलिस अधीक्षकांनी तोडाभीम पोलिस ठाण्याचे अधिकारी रामखिलाडी मीना यांना आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोपी शिक्षकाला अवघ्या ३६ तासांत अटक करण्यात आली. पीडित मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, शिक्षक धनराज मीना याने तिला ट्यूशनच्या बहाण्याने शाळेत बोलावले होते. धनराजने तिच्यासोबत गैरकृत्य केले. पीडित मुलीने घरी येऊन सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर वडिलांनी आरोपी धनराज मीणाविरुद्ध तोडाभीम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

तोडाभीमचे पोलीस अधिकारी राम खिलाडी मीना यांनी सांगितले की, 376 आयपीसी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. अवघ्या 36 तासांत आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. या घटनेनंतर शाळेत आरोपी शिक्षकाविरोधात संतापाचे वातावरण आहे. आम्ही मोठ्या विश्वासाने आमच्या मुलींना शाळेत पाठवतो, गुरु हे आई-वडिलांइतकेच पवित्र नाते आहे. जर हेच गुरु आमच्या मुलीचे लैंगिक शोषण करणार असतील तर हा मोठा गुन्हा आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. (In Rajasthan, a teacher raped a girl in the classroom)

इतर बातम्या

ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये तिने ‘बॉयफ्रेण्ड’ समूजन बहिणीशी केले चॅटींग; 10 वर्षांनंतर झाला उलगडा

Kalicharan: कालीचरण बाबाला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.