‘या’ देशात पाण्यापेक्षा स्वस्त मिळते दारू ! फक्त 18 रुपयांत..

जगभरात मद्यप्रेमींची कमतरता नाही. त्यामुळेच दारू खूप महाग असली तरी, सर्वत्र मद्याची दुकानं दिसतात. पण एक देशा असाही आहे जिथे दारू अवघ्या 18 रुपयांत मिळते.

| Updated on: Dec 30, 2025 | 3:40 PM
1 / 5
दारू पिणं बऱ्याच लोकांना आवडतं, त्यामुळे ती कितीही महागडी असली तरी प्रत्येक देशात मद्याची दुकानं ही असतातच. पण एक देश असाही आहे जिथे दारू ही पाण्यापेक्षा स्वस्त मिळते. हो, हे खरं आहे. एका देशात दारू, बीअर अवघ्या 18 रुपयांमध्ये मिळते. या देशात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात दारू उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तिथे  पाण्याच्या बाटलीपेक्षाही दारू स्वस्त आहे. यामुळेच अनेक लोकांना या देशाला भेट द्यायला आवडतं. पर्यटनासोबतच, लोक या देशात होणाऱ्या वाइन फेस्टिव्हलचा थरार देखील अनुभवतात.

2 / 5
जवळजवळ सर्व दारूप्रेमींना भारतात स्वस्त दारू कुठे मिळते हे माहित असतं आणि ते ठिकाण म्हणजे गोवा. म्हणूनच पर्यटक बीच आणि दारूचा आनंद घेण्यासाठी गोव्यात येतात. गोव्यात भारतातील सर्वात स्वस्त बिअर आणि दारू मिळते. याव्यतिरिक्त, स्थानिक बिअर देखील तेथे स्वस्तात मिळते. भारतातील इतर अनेक राज्यांपेक्षा गोव्यात दारू खूपच स्वस्त आहे.

3 / 5
पण जगातील सर्वात स्वस्त बिअर व्हिएतनाममध्ये उपलब्ध आहे आणि तिचं नाव आहे 'बिया होई. या बिअरची किंमत इतकी कमी आहे की अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाही. या दारूच्या म्हणजेच बिया होआच्या एका ग्लासची किंमत फक्त 5 हजार  व्हिएतनामी डोंग आहे,रुपयांमध्ये कन्व्हर्ट करायचं झालं तर त्याची किंमत होते फक्त 18 रुपये. या देशातील काही गर्दीच्या भागात, याच बिअरची किंमत वाढते, पण ती  फक्त 20 ते 25 रुपये होते असा अंदाज आहे.

4 / 5
विशेष म्हणजे येथे एका पाण्याच्या बाटलीची किंमत सुमारे 30 हजार डोंग आहे. भारतीय चलनात, पाण्याच्या बाटलीची किंमत सुमारे 100 रुपये होते.  व्हिएतनामी बिअर स्थानिक लोक बनवतात. ही बिअर कॅन किंवा बाटल्यांमध्ये उपलब्ध नाही तर मोठ्या बॅरलमध्ये उपलब्ध असते.

5 / 5
इथे बिअर  तयार केली जाते आणि ती ताजी असताना लगेच विकली जाते, ज्यामुळे ती स्वस्त पडते. ही बिअर स्थानिक रहिवाशांसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, ज्यामुळे रोजगार मिळतो. अल्कोहोलची विक्री इतर उद्योगांनाही चालना देते. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही)