मनात संशयाची सुई घुसली अन् क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेली, पती-पत्नीमध्ये नेमकं काय घडलं?

त्या दोघांचा सुखाचा संसार सुरु होता. पण पतीच्या मनात संशयाचा कीडा घुसला. मग त्यांच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की सर्वच संपले.

मनात संशयाची सुई घुसली अन् क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेली, पती-पत्नीमध्ये नेमकं काय घडलं?
बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू
Image Credit source: Google
| Updated on: Apr 19, 2023 | 9:03 PM

लखीमपूर खिरी : पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. याच संशयामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले अन् या वादाने होत्याचं नव्हतं केले. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांनी त्याला अदलाबाद गावातून अटक केली आहे. रामकुमार असे अटक आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

जुम्मन पुरवा गावात रामकुमार आपली पत्नी रामकलीसोबत राहत होता. रामकलीचे आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचा रामकुमारला संशय होता. या कारणातून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. यादरम्यान मंगळवारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला अन् रामकुमारने पत्नीची थेट हत्याच केली. या घटनेनंतर गावात एकच कल्लोळ माजला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली. अखेर आरोपी अदलाबाद गावाजवळ अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.