AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाला नकार दिला, तरुण भडकले, बदला घेण्यासाठी काय केले पहा?

प्रेमभावनेला कलंक लावणारी एक घटना उघडकीस आली आहे. ज्या मुलीवर प्रेम करत होते, तिने नकार देताच तरुणांनी जे केले ते पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल.

प्रेमाला नकार दिला, तरुण भडकले, बदला घेण्यासाठी काय केले पहा?
प्रपोज नाकारले म्हणून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्राद्वारे तरुणीची बदनामीImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 21, 2023 | 2:47 PM
Share

उधमसिंह नगर : उत्तराखंडमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणांनी तरुणींचे आक्षेपार्ह पोस्टर गावभर लावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

मुलींना प्रपोजलला नकार दिला म्हणून बदला घेतला

उधम सिंह नगरमध्ये राहणारे दोन तरुण गावातील दोन मुलींच्या मागे लागले होते. दोघांनी मुलींसमोर प्रेमप्रकरणाचा प्रस्ताव ठेवला, मात्र मुलींनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. मुलींच्या नकारामुळे दोघेही चांगलेच संतापले आणि नकाराचा बदला घेण्यासाठी दोघांनीही लज्जास्पद कृत्य केले. दोन्ही तरुणांनी मुलींचे आक्षेपार्ह पोस्टर्स छापले. त्यावर मुलींच्या फोटोंसोबत त्यांचे मोबाईल क्रमांकही टाकले. तरुणांनी गावभर हे आक्षेपार्ह पोस्टर्स लावले. पोस्टर्स पाहून गावकरी हैराण झाले.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु

पोस्टर पाहून संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. मुलींच्या नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली. मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी प्रिटिंगसह सर्व पुरावे गोळा करण्यात येत असून, या प्रकरणाचा तपास महिला उपनिरीक्षक करीत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग