CRIME NEWS : कल्याण खडकपाडा परिसरात जबरी चोरी, नजर चुकवून चोरटा घरात शिरला, मग…

मागच्या काही दिवसात कल्याणमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी काही घटनांचा छडा देखील लावला आहे. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण सुध्दा वाढवलं आहे.

CRIME NEWS : कल्याण खडकपाडा परिसरात जबरी चोरी, नजर चुकवून चोरटा घरात शिरला, मग...
khadakpada police station
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 09, 2023 | 1:51 PM

कल्याण : कल्याण (Kalyan) पश्चिम परिसरातील मोहने भागातील एका रहिवाशाच्या घरात दिवसाढवळ्या येऊन कुटुंबातील सदस्यांची (Family member) नजर चुकून अज्ञात व्यक्तीने 9 लाख 94 हजार रुपये किमतीचे 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे दुपारी जेवण करून हवा खाण्यासाठी घराचा दरवाजा उघडा केला, असता कुटुंबातील सदस्यांची नजर चुकवून चोरटा घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले 35 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सुरेश कान्हू पाटील नामक पीडित व्यक्तीने कल्याण खडकपाडा पोलीस (Khadakpada Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास करीत आहेत.

मागच्या काही दिवसात कल्याणमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी काही घटनांचा छडा देखील लावला आहे. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण सुध्दा वाढवलं आहे. चोरटे प्रत्येकवेळी नव्या आयडिया वापरत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. चोरीच्या घटना घडल्यापासून परिसरात नागरिक सतर्क झाले आहेत.

पोलिसांनी तिथल्या परिसरातील सीसीटिव्हीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संशय आहे की, तिथल्या जवळच्या चोरट्याने तिजोरीवरती डल्ला मारला आहे. कुटुंबातील सदस्यांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे. परिसरातील काही संशयित लोकांची सुध्दा चौकशी होणार आहे.

कल्याणमध्ये या आगोदर सुध्दा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरटे प्रत्येकवेळी नव्या आयडिया शोधून चोरी करीत असल्यामुळे पोलिस सुध्दा चिंतेत आहेत. मारामारीच्या सुध्दा अनेक घटना घडत आहेत.