AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार, अश्लील व्हिडीओने तरूणीला केलं ब्लॅकमेल… राजकीय पदाधिकाऱ्याला अखेर अटक

कल्याणमध्ये दीड महिन्यांपासून फरार असलेला बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली. लग्नाचे आमिष दाखवून २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये इतर मुलींचेही व्हिडिओ आढळल्याने पुढील तपास सुरू आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

Kalyan Crime : लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार, अश्लील व्हिडीओने तरूणीला केलं ब्लॅकमेल... राजकीय पदाधिकाऱ्याला अखेर अटक
कल्याण क्राईम न्यूज
| Updated on: Dec 01, 2025 | 1:30 PM
Share

कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नसून आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षांच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून आधी तिच्यावर बलात्कार करण्यात आलं. अएवढंच नव्हे तर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी प्रियकराला खडकपाडा पोलिसांनी तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर अटक केली. कल्याण पश्चिमेतील फडके मैदान परिसरात पोलिसांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या. विनीत गायकर असे या आरोपीचे नाव असून तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

दीड महिन्यापूर्वी आरोपीने राजकीय बळाचा वापर करत तरुणीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी चौकशी करत याप्रकरणी पीडित मुलीची तक्रार घेतली आणि आरोपीवर बलात्कार ब्लॅकमेलिंग आणि अन्य गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर गायकर हा फरार झाला, अखेर दीड महिने त्याचा कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आरोपीने या तरूणीसह अन्य किती मुलींसोबत अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, पीडित तरुणी आणि आरोपी विनीत गायकर यांच्यात प्रेमसंबंध होते. विनीतने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले इतकेच नाही तर तिचे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपीने तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. एके दिवशी तरुणीच्या हाती आरोपीचा मोबाईल लागला. त्यामध्ये तिचेच नव्हे, तर इतर मुलींचेही अश्लील व्हिडिओ सापडले. तरुणीने हा मोबाईल आपल्याकडे ठेवला आणि त्याच्यासोबत आपले प्रेम संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

मात्र आपला मोबाईल परत मिळवण्यासाठी आरोपी विनीत गायकर याने राजकीय बळ तरुणीवर मोबाईल चोरीचा खोटा आळ आणला आणि पोलिसांकडे जाऊन तिची तक्रार केली. तिच्यावर दजबाव आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी तरुणीची चौकशी केल्यानंतर आणि तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ हाती लागल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले.

यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेत आरोपी विनीत गायकर याच्यावर ब्लॅकमेलिंग ,बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला होता. मात्र, खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू ठेवत, तब्बल दीड महिन्यानंतर कल्याण पश्चिम येथील फडके मैदान परिसरात सापळा रचून आरोपी विनीत गायकर याच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान