येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर

| Updated on: Jan 28, 2022 | 10:50 PM

दिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र सायंकाळी सात नंतर कारण समोर आले आहे. आता सौंदर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी तिने आत्महत्या करण्याअगोदर बाळाला दुसऱ्या रूममध्ये सोडून, आपल्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर
saundraya suicide
Follow us on

बंगळुरूः भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नात सौंदर्याने केलेल्या आत्महत्येबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. माजी मुख्यमंत्र्यांची (Former Chief Minister) नात असणाऱ्या आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या सौंदर्याने (soundarya) आत्महत्या का केली यासारखे प्रश्न कर्नाटकातील (Karnataka) नागरिकांना पडत आहेत तसेच सवाल देशातील अनेक नेत्यानाही पडले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत सौंदर्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला नव्हता. मात्र याबाबत राजकीय नेत्यांची मते जाणून आणि येडियुरप्पा यांच्या विश्वासू असणाऱ्या अनेकांकडून माध्यमातील पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र दिवसभर आत्महत्येचं मूळ कारण समोर आले नव्हते.

दिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र सायंकाळी सात नंतर कारण समोर आले आहे. आता सौंदर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी तिने आत्महत्या करण्याअगोदर बाळाला दुसऱ्या रूममध्ये सोडून, आपल्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फोन करुनही दरवाजा उघडला नाही

बंगळुरूमध्ये शुक्रवारी सकाळी डॉक्टर असणारे सौंदर्याचे पती नीरज नेहमीप्रमाणेच आपल्या ऑफिससाठी निघून गेले होते. त्यानंतर सौंदर्या आणि त्यांचा मुलगा घरी होते. थोड्या वेळाने घरकाम करणारी त्यांच्या नोकरानीने डॉ. नीरज यांना फोन करून सांगितले की, मॅडम सौंदर्या घराचा दरवाजा उघडत नाहीत. त्यानंतर नीरज ताबोडतोब ते घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनीही घराची बेल वाजवून दरवाजा उघडते का याचा प्रयत्न केला. मात्र कितीतरी वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

पतीही डॉक्टर

दरवाजा तोडून आत घरी गेल्यानंतर घरातील दृश्य बघून त्यांना धक्का बसला, कारण घराच्या छताला सौंदर्याचा मृतदेह लटकत होता. हे दृश्य पाहताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

छताला लटकलेला मृतदेह

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घरी येऊन सौंदर्याचा छताला लटकणारा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सगळ्या घराची झडती घेतली, कारण याबाबत काही दागेदोरे मिळतात का ते बघितले मात्र तिच्या आत्महत्याबाबत कोणतेच दागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत.

अंत्यसंस्कार बंगळुरूमध्ये

सौंदर्याने आपल्या लहान मुलाला एका खोलीत सोडून तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना येडियुरप्पा समजली तेव्हा तेव्हा ते हुबळीमध्य होते. निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे की, सौंदर्याच्या अंत्यसंस्कार बंगळूरु शहराच्या बाहेर असणाऱ्या डॉ. नीरज यांच्या फार्महाऊस परिसरात करण्यात येणार आहेत.

येडियुरप्पा यांची नात सौंदर्या ही पेशाने डॉक्टर होती. तिचे वय अवघे 30 होते. दोन वर्षापूर्वी डॉ. नीरज यांच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. दोन वर्षे त्यांचा संसारही सुरळीत चालला होता.

नैराश्येतून आत्महत्याः कर्नाटकचे गृहमंत्री

येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मा यांची ही सौंदर्या मुलगी. पेशाने डॉक्टर असणाऱ्या सौंदर्याने आत्महत्या का केली हा सर्वांना पडलेला प्रश्न असला तरी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, सौंदर्या आपल्या गरोदरपणानंतर मानसिक तणावाखाली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याची शक्यता त्यांचे निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Mumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन? वाचा सविस्तर

गुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण