व्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन? वाचा सविस्तर

आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आर्थिक सल्लागार हे पद रिकामेच होते. त्यांच्यानंतर या पदावर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. आता व्ही. अनंत नागेश्वरन यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

व्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन? वाचा सविस्तर
v anantha nageswaran
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 8:20 PM

नवी दिल्लीः देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदी व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपल्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती (appointed) करण्यात आली नव्हती. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक केली नव्हती. त्यानंतर व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) जगात तिसऱ्या क्रमाकांची आहे. कोरोनासारखी (Corona) महामारी येऊनही भारताच्या अर्थव्यवस्थेला  कोणताही धक्का पोहचला नाही. मात्र बेरोजगारीसारखा गंभीर प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे भारत सरकारसमोर एक भक्कम अर्थव्यवस्था उभी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे प्रश्न असले तरी या परिस्थितीत नवीन मुख्य आर्थिक सल्लागारांकडून गुंतवणूकीचे पुनरुज्जीवन करणे आणि अर्थसंकल्पातील तफावत भरून काढताना उच्च वाढीसाठी नवी योजना काय आखणार याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन हे आंध्र प्रदेशातील विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांना आर्थिक परिस्थिती हातळण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. डॉ. नागेश्वरन यांनी 1985 मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए केले आहे. देवाण-घेवाणीच्या आर्थिक व्यवहारावर त्यांचे मोठे काम आहे. मॅसॅच्युसेटस एमहर्स्ट विद्यापीठाने त्यांना डॉक्टर पदवी प्रदान केली आहे.

परदेश संस्थांमधील कामाचा दीर्घ अनुभव

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सिंगापूरमधील बॅंक ज्युलियस बेयर अॅंड कंपनीचे गुंतवणूक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन हे आयएफएमआर स्कुल ऑफ बिझनेसचे 2018 ते 2019 या काळात ते मुख्य अधिष्ठाता राहिले आहेत. त्यानंतर 2021 पासून त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

बेरोजगारीच्या प्रश्नांच्या निर्णयावर लक्ष

कोरोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. सध्याच्या काळात भारतासमोर खरी समस्या निर्माण झाली आहे, बेरोजगारीची. खासगी क्षेत्रात आर्थिक मंदीचा फटका बसल्याने बेरोजगारीच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. कोरोना काळात बिघडलेली आर्थिक घडी योग्य मार्गावर आणण्याचे काम डॉ. नागेश्वरन यांच्याकडे असणार आहे. वेगवेगळ्या संस्थांमधून त्यांनी अर्थव्यवस्थेची कामं बघितली असली तरी सध्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा प्रश्न असल्याने त्यांचा प्रत्येक निर्णय हा देशासाठी कसा ठरणार हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे महामारीच्या काळातील अर्थव्यवस्थेला ते कशी झळाली मिळवून देतात ते आता त्यांचे निर्णयच उत्तर देणार आहेत.

संबंधित बातम्या

BUDGET EXPECTATION FROM SALARIED CLASS : सर्वसामान्य नौकरदार, मध्यमवर्गीयांना यंदाच्या बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.