Ketan Agarwal Case : बॉयफ्रेंड चेतनसोबत सियाचे खास क्षण, ‘तो’ व्हिडीओ समोर; पोलिसांकडून मोठी अपडेट

Siya Goyal-Chetan Chaudhary Video :  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक माहिती समोर येत आहे. आता सिया आणि चेतन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Ketan Agarwal Case : बॉयफ्रेंड चेतनसोबत सियाचे खास क्षण, तो व्हिडीओ समोर; पोलिसांकडून मोठी अपडेट
| Updated on: Jun 28, 2026 | 9:17 AM

Siya Goyal-Chetan Chaudhary Video : केतन अग्रवाल – सिया गोयल – चेतन चौधरी… हे त्रिकूट सध्या सर्वत्र चर्चेत आहे… सिया हिचं केतन सोबत साखरपुडा झाला, पण तेने केतन याला कधी जोडीदाराच्या रुपात पाहिलंच नाही. कारण तिचं तर चेतन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांना लग्नासाठी विरोध करु न शकणाऱ्या सिया हिने बॉयफ्रेंडच्या मदतीने केतन याची हत्या केली. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. दरम्यान, सिया आणि चेतन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला.

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे एका क्रिकेट सामन्यादरम्यान भारतीय संघाची जर्सी घालून एकत्र बसलेले दिसत आहेत. ते सामन्याचा आनंद घेताना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातील असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची पहिली ओळख भाऊ साहिल गोयल याच्या क्रिकेट सामन्या दरम्यान झालेली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील दोघे भेटले आणि दोघांची ओळख प्रेमात बदलली. गेल्या तीन वर्षांपासून चेतन आणि सिया एकमेकांना डेट करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

 

 

पोलिसांना अतापर्यंत काय मिळालं?

तपासादरम्यान, पोलिसांनी चेतन आणि सिया यांच्या मोबाईल फोनवरील कॉल रेकॉर्ड्सचे विश्लेषण केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून त्यांच्यात 2004 वेळा संपर्क झाला होता आणि त्यांच्यातील एकूण संभाषणाचा कालावधी 238 तास इतका होता. पोलीस या रेकॉर्ड्सना तपासातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्या फोनवरून डिलीट केलेले व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅट्स पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक टीमडून केला जात आहे.

घटनेच्या आधी कॅफेमध्ये झाली भेट

तपासात असं देखील समोर आलं आहे की, घटनेच्या एक दिवस आधी चेतन आणि सिया यांची भेट पुण्यातील एक कॅफेमध्ये झालेली. पोलिसांसाठी ही भेट फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्या भेटी दरम्यान सिया आणि केतन यांच्यामध्ये काय बोलणं झालं. याची माहिती पोलीस घेत आहे… एवढंच नाही तर, डीजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस पाहत आहेत.

केतन – सिया यांच्या कुटुंबियांचं काय आहे म्हणणं?

सिया आणि चेतन यांच्यातील कथित संबंधांची आम्हाला काहीच कल्पना नव्हती, असं दोन्ही कुटुंबांनी सांगितलं आहे. केतनच्या वडिलांनी असा दावा केला की, जर सियाने लग्नासाठी आधीच नकार दिला असता, तर हे लग्न जुळवण्याची प्रक्रिया पुढे गेली नसती. दरम्यान, सियाच्या कुटुंबीयांनीही या कथित संबंधांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

सध्या पोलीस सर्व डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अधिक तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तपासाला निश्चितच एक नवीन पैलू प्राप्त झाला असला, तरी त्याचे कायदेशीर महत्त्व आणि परिणाम तपास पूर्ण झाल्यानंतर व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतरच स्पष्ट होतील. आता या प्रकरणात पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us