
हरियाणा : राज्यात (HARIYANA) एका धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला दोन तरुणांनी मारहाण (CRIME NEWS) केली आहे, त्याचबरोबर त्याच्या प्राव्हेट पार्टमध्ये बिअरची बॉटल घुसवली असल्याची तक्रार त्याने पोलिस स्टेशन दिली आहे. ज्यावेळी त्या तरुणाने दोन तरुणांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये (HARIYANA POLICE) तक्रार दिली असल्याचं समजलं. त्यावेळी आरोपी तरुणांनी त्या तरुणाला अपहरण केलं. दीड महिना त्या तरुणाला बांधून ठेवलं होतं. त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा सुरुवातील तक्रार समजून घेतली नाही असं तो तरुण सांगत आहे.
हे प्रकरण हरियाणा राज्यातील पलवल शहर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतं, पीडित तरुणाने दोन आरोपींवरती गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सुध्दा कारवाई करण्यास मनाई केली होती असा आरोप तरुण करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण श्याम नगर येथील रहिवासी आहे. हा सगळा प्रकार सात जूनला झाला आहे. मध्यरात्री तीन वाजता अगवानपूर गावातील दोन तरुण त्याच्या घरी पोहोचले.
पीडित तरुणाने तक्रार केली आहे की, दोन तरुणांनी पीडित तरुणाला सुरुवातीला मारहाण केली. त्यानंतर त्याला घराच्या एका खोलीत घेऊन गेले. त्यांच्या अंगावरील कपडे काढले. त्या तरुणाच्या तोंडात कपडे कोंबले, त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बिअर घुसवली. घरातला राडा ऐकून ज्यावेळी शेजारी आले, त्यावेळी त्यांना दोन तरुणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणाने ज्यावेळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी त्या तरुणांवरती कसलीचं कारवाई केली नाही.
ज्यावेळी त्या तरुणाने तक्रार केली, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर काहीचं कारवाई केली नाही. आरोपींना या गोष्टीची माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी तरुणाचं अपहरण केलं. दीड महिना त्या तरुणाला बांधून घातलं. पीडित तरुणाने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाने पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या कुठल्याचं आरोपीला अटक केलेली नाही.