भरधाव वेगात असलेली कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पाच दिवसात तीन अपघात

| Updated on: Mar 27, 2023 | 2:13 PM

या घटनेने निलंगा शहरावर शोककळा पसरली आहे. लातूर जिल्ह्यातल्या वांजरवाडा , निलंगा आणि आता औसा अश्या तीन ठिकाणी गेल्या पाच दिवसात तीन मोठे अपघात झालेले आहेत .

भरधाव वेगात असलेली कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पाच दिवसात तीन अपघात
latur accident
Image Credit source: tv9marathi
Follow us on

लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातल्या औसा-निलंगा (ausa to nilanga )रस्त्यावरच्या चलबुर्गा पाटीजवळ कार (car accident) उलटल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे येथून लग्न सभारंभ आटोपून सचिन बडूरकर आणि त्यांचे कुटुंबीय निलंगाकडे परतत होते. त्यावेळी त्यांची कार औसा तालुक्यातल्या चलबुर्गा पाटी जवळ आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात कार रस्त्याखाली जाऊन उलटली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्न समारंभ आटोपून घरी निघाले…

या अपघातात निलंगा येथील व्यवसायिक सचिन बडूरकर यांची दोन मुले अमर बडूरकर (वय १४) व जय बडूरकर (वय-१०), पुतण्या अंश बडूरकर (वय-१०) मेव्हणा प्रकाश कांबळे (वय -२७) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर औसा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन बडूरकर यांच्या जवळच्या नातेवाईकाचे पुणे येथे लग्न होते अशी माहिती मिळाली आहे.

पाच दिवसात तीन मोठे अपघात

हे लग्न आटोपून निलंगा येथील नवरदेव असल्याने नवरदेव आणि नवरी एका गाडीने आणि दुसऱ्या गाडीने हे बडूरकर कुटूंबिय निलंगाकडे निघाले होते. वधू-वर यांची कार सुखरूप घरी पोहोचली. मात्र बडूरकर यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला. या घटनेने निलंगा शहरावर शोककळा पसरली आहे. लातूर जिल्ह्यातल्या वांजरवाडा , निलंगा आणि आता औसा अश्या तीन ठिकाणी गेल्या पाच दिवसात तीन मोठे अपघात झालेले आहेत .

हे सुद्धा वाचा