उसने पैसे दिले, स्वत:चे पैसे परत मागतानाही कुचंबणा, मित्राकडून घात, गळा आवळून जंगलात फेकलं!

| Updated on: Mar 19, 2021 | 12:38 PM

भंडाऱ्यात तर उसन्या पैशावरुन हत्याकांड झालं आहे. उसने दिलेले पैसे मागितल्याने मित्राच्या सहाय्याने गळा आवळून हत्या झाल्याची घटना भंडाऱ्यात झाली.

उसने पैसे दिले, स्वत:चे पैसे परत मागतानाही कुचंबणा, मित्राकडून घात, गळा आवळून जंगलात फेकलं!
भंडारा खून प्रकरण
Follow us on

भंडारा : पैसे उसने देणे किंवा घेणे हा आपल्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहार आहे. याच उसन्या पैशांवरुन सख्खे मित्र किंवा नातेवाईक कट्टर शत्रू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यात तर उसन्या पैशावरुन हत्याकांड झालं आहे. उसने दिलेले पैसे मागितल्याने मित्राच्या सहाय्याने गळा आवळून हत्या झाल्याची घटना भंडाऱ्यात झाली. इतंकच नाही तर पुरावे मिळू नयेत म्हणून मृतदेह कालव्यात फेकला. मात्र कायद्याचे हात कुठपर्यंत पोहोचू शकतात, हे भंडारा पोलिसांनी अवघ्या 3 तासात दोघांना बेड्या ठोकून दाखवून दिलं. (Maharashtra Bhandara crime news man murdered friends for borrows money)

नेमकं प्रकरण काय?

54 वर्षीय नीलकंठ फागों बाहे हे भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दवडीपार गावात राहतात. त्यांनी फुलचंद बांते (वय 48 वर्ष) यांना 1 लाख रुपये दिले होते. मात्र ते परत मागितल्याने फुलचंद बांते आणि तेजराम धुर्वे (वय 34 वर्ष) यांनी त्यांचा काटा काढल्याचा आरोप आहे.

भंडारा तालुक्यातील दवडीपार जंगलात मालीपार तलावाजवळ एक अनोळखी मृतदेह आढळला होता. त्याची माहिती दवड़ीपार गावातील पोलिस पाटील यांनी कारधा पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतकाची ओळख पटवली. भंडारा शहरतील खात रोड येथील नीलकंठ बाहे यांचा तो मृतदेह होता.

पैशांवरुन बाचाबाची? 

नीलकंठ हे BSNL कंपनीचे कंत्राटदार होते. ते व्याजाने पैसे देत होते. त्यांनी फुलचंद बांते यांना 1 लाख रुपये दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. फुलचंद यांनी पैसे परत न केल्याने, नीलकंठ यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.

नीलकंठ वारंवार पैशाची मागणी करत असल्याने, त्याचा काटा काढण्यासाठी फुलचंद यांनी आपला मित्र आरोपी तेजराम धुर्वे याच्यासोबत कट रचला. या दोघांनी नीलकंठ यांना पैसे घेण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. मग मृतदेह दवडीपार जंगलात मालीपार तलावाजवळ नेऊन फेकला.

संबंधित बातम्या  

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला, पोलिस दिसताच वऱ्हाडींनी पळ काढला

शेजाऱ्यांनी केक देऊन फसवलं, 12 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकललं, ‘त्या’ व्हॉट्सअॅप ग्रुपचा शोध सुरु!     

13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत विवाह, सुहागरात आणि वैधव्याचं नाटक, लग्न जुळवण्यासाठी शिक्षिकेचा उपद्व्याप 

(Maharashtra Bhandara crime news man murdered friends for borrows money)