AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर एक व्यक्ती जखमी पडलाय, ज्याने फोन करून दिली माहिती तोच.. चुलतीमुळे गेला जीव ! नेमकं काय झालं ?

सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर यांनीच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांच्या तपासा दरम्यान जे उघड झालं..

रस्त्यावर एक व्यक्ती जखमी पडलाय, ज्याने फोन करून दिली माहिती तोच.. चुलतीमुळे गेला जीव ! नेमकं काय झालं ?
| Updated on: Aug 13, 2025 | 11:34 AM
Share

चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्याच्या रागातून एका इसमाचा निर्घृण खून करण्यात आला. हॉकी स्टिक अन् लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याला संपवण्यात आलं. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील  चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीमध्ये 12 ऑगस्ट रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय झालं ?

पोलीस हवलदार राहुल रामचंद्र गिरमे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार चंदन नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १०३ (१)३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिल्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ती मयत व्यक्ती म्हणजे साईनाथ उर्फ खलबली दत्तात्रय जानराव असल्याचे उघड झाले एवढंतच नव्हे तर त्याला दारूचे व्यसन असल्याचेही समोर आले.. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली..

चुलतीची छेड काढली म्हणून जीवच घेतला

पोलिसांनी अधिक तपास करत सखोल चौकशी केली असता सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा या दोन्ही आरोपींची नावे समोर आली. मयत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वालेकर याच्या चुलतीची छेड काढली होती. इतकंच नव्हे तर तो तिला आय लव्ह यू असं देखील म्हणाला होता. त्यामुळे भडकलेल्या आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या साईनाथला ते तसेच सोडून निघून गेले होते. मात्र वर्मी घाव लागल्याने साईनाथचा मृत्यू झाला.

दरम्यान आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर यांनीच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांच्या तपासा दरम्यान त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग