संशयाचं भूत ! तिच्या अफेअरच्या शंकेमुळे तो बिथरला, प्रेशर कूकर तिच्या…

श्रद्धा वालकर मर्डर केसच्या भयानक आठवणी पुन्हा ताज्या करणारं असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आल आहे. प्रेयसीच्या अफेअरच्या संशयावरून बिथरलेल्या प्रियकराने अत्यंत खतरनाक पाऊल उचललंल

संशयाचं भूत ! तिच्या अफेअरच्या शंकेमुळे तो बिथरला, प्रेशर कूकर तिच्या...
| Updated on: Aug 28, 2023 | 3:05 PM

बंगळुरू | 28 ऑगस्ट 2023 : आयटी हब अशी ओळख असणाऱ्या बंगळुरूमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर केस असो किंवा मीरा-रोडमधील लिव्ह -इन पार्टनरची नृशंसपणे केलेली हत्या, या सर्व गुन्ह्यांची भयानक आठवण ताजी करणाऱ्या तितक्याच एका नृशंस कृत्याने शहर हादरलं. बंगळुरूमध्ये एका 24 वर्षीय तरूणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने प्रेशर कूकर (pressure cooker) डोक्याात मरून हत्या (murder) केल्याचे उघड झाले आहे. तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या, (मूळचा केरळचा असलेला) आरोपी वैष्णव याला अटक करण्यात आली आहे. बेगुर भागातील न्यू माइको लेआऊट येथे शनिवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. अटकेत असलेला आरोपी , वैष्णव हा देखील 24 वर्षांचाच आहे.

तीन वर्षांपासून होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळचा राहणारा वैष्णव आणि देवा ( मृत तरूणी) हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून बंगळुरू येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. मात्र आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देत आहे, असा संशय आरोपीला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्या दोघांचेही सहकारी, कुटुंबिय आणि आजूबाजूला राहणारे लोक यांचीही चौकशी पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

 

आरोपीला होता गर्लफ्रेंडवर संशय

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघेही (मूळचे) केरळचे असून इथे लिव्ह-इन पार्टनर होते. काही दिवसांपूर्वी आरोपी वैष्णव याला मृत महिलेबद्दल संशय वाटू लागला. त्यावरून त्या दोघांचं भांडणही व्हायचं. हत्येच्या दिवशीही तेच झाले. दोघे एकमेकांशी भांडले आणि संतापाच्या भरात आरोपीने प्रेशर कूकर घेऊन तरूणीच्या डोक्यात हाणला. नंतर तो तेथून फरार झाला. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झाली व अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला.

कुटुंबियांना होती कल्पना, लवकरच लग्नही करणार होते

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणीचे नाव देवा असून ती केरळच्या तिरूअनंतपुरम येथील रहिवासी होती. तर आरोपी वैष्णव हा कोल्लम येथे रहायचा. दोघांनीही एकाच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. तीन वर्षांपासून ते बंगळुरूत एकत्र रहायचे. त्यांच्या कुटुंबियांनाही याबद्दल कल्पना होती. ते दोघे लवकरच लग्नही करणार होते, अशी माहिती समोर आली आहे.