Mansukh Hiren | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण NIA कडे?; दोन दिवसात निर्णयाची शक्यता

| Updated on: Mar 06, 2021 | 11:04 PM

यामुळे या प्रकरणाचं नक्की काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. (Mansukh Hiren Death Case will enquiry by NIA) 

Mansukh Hiren | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण NIA कडे?; दोन दिवसात निर्णयाची शक्यता
मनसुख हिरेन
Follow us on

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा काल (5 मार्च) संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यानंतर आता ही दोन्हीही प्रकरण एनआयएकडे तपासासाठी देण्याची तयारी करण्यात येत आहे. आज किंवा उद्या याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Mansukh Hiren Death Case will enquiry by NIA)

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारबाबतचे कोड आता वाढत चाललं आहे. अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारीला संशियत कार सापडली होती. या कारमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या आणि चिठ्ठी आढळली होती. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या. यावेळी दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक गाडी पार्क झाली आणि एक गाडी पुन्हा निघून गेली. त्यानंतर पोलिसांना काही माहिती मिळालेली नाही. गेली दहा दिवस या तपासाला खिळ बसली आहे. त्यातच कालच्या घटनेने या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे. काल कार मालक हिरेन मनसुख यांचा संशयास्पदरित्य मृतदेह आढळला. यामुळे या प्रकरणाचं नक्की काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

या घटनेचा तपास कोण करणार ?

अंबानी च्या घराजवळ गाडी सापडली. त्यात जिलेटीन सापडले. याचा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला. खरं तर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने तपास
एटीएस द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही. पुढे दोन दिवसांनी या बाबत काहीच तपास होत नसल्याने सचिन वाझे यांना हटवून त्यांच्या जागी सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.  नुकतंच गृहमंत्रालयाकडून याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं आहे.

पण क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तपास गुन्हा एनआयएकडे दिला जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. यामुळे आता एनआयएकडेच तपासासाठी कागदपत्रे देण्यात तयारी करण्यात येत आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला

दरम्यान, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.  (Mansukh Hiren Death Case will enquiry by NIA)

संबंधित बातम्या : 

Mansukh Hiren Death Case | ‘ते’ तावडे कोण?

Mansukh Hiren Death Case | मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?