
एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर करुन पनीर रोल मागवला होता. त्याच्या जागी त्याला एग रोलची डिलीवरी झाली. यावरुन मोठा गदारोळ झाला. विषय पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. पीडित मंदिरातील एका सेवादार असल्याच सांगितलं जातय. धर्म भ्रष्ट करण्याच्या कारस्थानाअंतर्गत हे सर्व करण्यात आलय असा पीडित व्यक्तीच म्हणणं आहे. हे सर्व मेरठमधील प्रकरण आहे. घटना बुधवारी रात्रीची आहे. दिल्ली रोड विश्व एनक्लेव येथे राहणारा नीतीश आपल्या सासरी टीपी नगरला आला होता. त्याने बेगमपुर जीआयसी समोरच्या बाप ऑफ रोलच्या नावाच्या दुकानातून ऑनलाइन पनीर रोल ऑर्डर केला होता.
ऑर्डर घरी आल्यानंतर नितीशने रोल खायला सुरुवात केली. त्यावेळी टेस्ट पनीर रोलची नसल्याच त्याच्या लक्षात आलं. त्याच्यात अंड्याची टेस्ट होती. दुकानदाराने त्याला पनीर रोलच्या जागी एग रोल दिला होता. यामुळे आपला धर्म भ्रष्ट झाला असं नितीशच म्हणणं आहे. नितीशने या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आणि चुकीचं सामान पाठवल्याची तक्रार दिली आहे. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नितीश एका मंदिरात सेवादाराच काम करतो असं सांगितलं जातय.
‘मी माझ्या जीवनात कधीही अंड खाल्लेल नाही’
दुकानदाराकडे सुद्धा याची तक्रार करण्यात आलीय. त्याने आपली चूक मान्य केली नाही. पीडित नितीशच म्हणण आहे की, त्याने पनीर रोलच्या जागी एग रोल खाल्ला. दुकानदाराविरोधात कारवाई करण्याची त्याची मागणी आहे. हे सर्व धर्म भ्रष्ट करण्याच्या कारस्थानातंर्गत करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. मी माझ्या जीवनात कधीही अंड खाल्लेल नाही. नितीशने कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. पोलीस या प्रकरणी तपास करतायत.