पुणेकरांनो मोबाईल सांभाळा; पाच दिवसात 500 मोबाईल चोरीला

| Updated on: Sep 05, 2022 | 9:21 PM

पुण्यात मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मोबाईल चोरांनी गर्दीचा फायदा घेत मोठा हात साफ केलेला पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून पाचच दिवसात तब्बल 500 ते 600 मोबाईल चोरीला गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरटे दिवसाला सरासरी 100 मोबाईल चोरत असल्याचे दिसून आले आहे.

पुणेकरांनो मोबाईल सांभाळा; पाच दिवसात 500 मोबाईल चोरीला
Follow us on

पुणे : दोन वर्षानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही( Pune) नागरीक मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी जात आहेत. यामुळे सर्वच गणेश मंडळांमध्ये मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे भाविकांच्या मोबाईलवर डल्ला(Mobile thieves) मारत आहेत. पाच दिवसात 500 पेक्षा अधिक मोबाईल चोरीला गेले आहेत. पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात रोज शंभर मोबाईल चोरीला जात आहेत.

पुण्यासह राज्यात यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात होत आहे . त्या निमित्ताने पोलिसांचा सर्वत्र तगडा बंदोबस्त पहायला मिळत आहे. तरीही पुण्यात मात्र मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मोबाईल चोरांनी गर्दीचा फायदा घेत मोठा हात साफ केलेला पाहायला मिळत आहे.
गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून पाचच दिवसात तब्बल 500 ते 600 मोबाईल चोरीला गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरटे दिवसाला सरासरी 100 मोबाईल चोरत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये घडणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.

दर्शनाला येणाऱ्या शेकडो भाविकांकडून मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस CCTV च्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत. तरी नागरीकांनी बेसावध न राहता आपले मोबाईल सांभाळावे अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील पाच मानाच्या गणपतीसह विविध मंडळांच्या गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पुणेकर मोठ्या संख्यने विविध मंडळांना भेटी देत आहेत. यामुळे सर्वत्रच मोठी गर्दी पहायला मिळत आहे.