Job Alert 2026 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांनो.. ही सुवर्ण संधी सोडू नका ! भारतीय नौसेना आणि वायुसेनेत बंपर भरती
सरकारी आणि संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन येत आहे. सीएससी ई-गव्हर्नन्स, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कुठे कुठे आहे संधी, घ्या जाणून ?

Job Alert : चांगला जॉब मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेक युवक युवती तर सराकरी नोकरीच्या शोधात असतात. सरकारी आणि संरक्षण क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी 2026 हे वर्ष अनेक मोठ्या संधी घेऊन आले आहे. ज्यांना सरकारी जॉब करण्याची इच्छा आहे, त्यांनी ही बातमी नक्की वाचा. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडियाने आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवले आहेत, तर भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय वायुसेनेने Airmen Group Y मेडिकल असिस्टंट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती म्हणजे देशातील तरूणांना स्थिर आणि सन्माननीय करिअर घडवण्याची एक उत्तम संधी आहे.
Aadhaar Supervisor भरती 2026
सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडियाने 2026 साठी आधार सुपरवायजर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 282 रिक्त पदं भरली जातील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाली असून येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत, ते cscspv.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
Indian Navy Recruitment 2026
भारतीय नौदलाने 2026 सालासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) ऑफिसर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. देशाची सेवा करताना सन्माननीय करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही अद्वितीय संधि आहे. निवडलेल्या उमेदवारांना सब लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 24 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. या पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IAF Recruitment 2026
ज्या तरूणांना किंवा तरूणींना भारतीय हवाई दलात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने Airmen Group Y(नॉन-टेक्निकल) मेडिकल असिस्टंट भरती 2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये किती पदांसाठी भरती हे, ती संख्या तर अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु निवडीमुळे प्रशिक्षण आणि नियमित पगारासह सेवा देण्याची संधी मिळेल.
